Eknath Shinde: तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलात रहाताय पण खर्च कोण करतंय? पत्रकारांनी साधा प्रश्न विचारला, केसरकरांनी भाजपाला ओढलं

| Updated on: Jun 25, 2022 | 5:53 PM

तुम्ही सातत्याने भाजपला यामध्ये का ओढत आहात. भाजप(BJP) यामध्ये कुठेच नाही. आम्ही भाजपशी बोलतोय, पण त्यामध्ये खर्चाचा काही भाग नाही. असे उत्तर दीपकी केसकर यांनी हॉटेलमधील वास्तव्या दरम्यान होणाऱ्या हॉटेलवरील खर्चाच्याबाबतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

Eknath Shinde: तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलात रहाताय पण खर्च कोण करतंय? पत्रकारांनी साधा प्रश्न विचारला, केसरकरांनी भाजपाला ओढलं
Dipak Kesarkar
Image Credit source: Tv9
Follow us on

गुवाहाटी- वेगवेगळ्या राज्यातून आमदार(MLA) बाहेर जात असतात. तेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारला जातो का? आपल्या इथं आमदारांना चांगला पगार आहे, त्यांचा खर्च ते उचलू शकतात. जसं आम्हा इथं शिंदे साहेबानी आमंत्रित केलं आहे. याचा अर्थ शिंदे साहेब काय इथे फुकट घेत नाहीत,  त्याचे पैसे आहेत. इथे जे काही सवलत मिळत आहे. ती वगळता सर्व खर्च आम्ही भरत आहोत. शिंदेसाहेब इथं आम्हाला घेऊन आले, त्यांना त्याचे पैसे द्यावे लागणार आहे. ते पेमेंट आम्ही करुन देऊ. तुम्ही सातत्याने भाजपला यामध्ये का ओढत आहात. भाजप(BJP) यामध्ये कुठेच नाही. आम्ही भाजपशी बोलतोय, पण त्यामध्ये खर्चाचा काही भाग नाही. असे उत्तर दीपकी केसकर यांनी हॉटेलमधील वास्तव्या दरम्यान होणाऱ्या हॉटेलवरील खर्चाच्याबाबतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. दीपक केसकर (Dipak Kesakar)यांनी झूमवरून पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली यावेळी त्यांना गुहावाटीतील हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या आमदारांच्या दैनंदिन खर्चाबाबत प्रश्न विचरण्यात आला होता . त्यावेळी त्याचे सविस्तर उत्तर दिले.

ईडीच्या भीतीनेही तर संवादाची कमतरता

आम्ही कुणीही ईडीच्या भीतीमुळे आलेलो नाही आहोत. गुवाहाटी असलेल्या आमदारांच्या पैकी केवळ एक दोघांनाच ईडीच्या रडावर असतील. पण बाकीची शेतकऱ्यांची पोरं आहेत. शेतकरी आमदार आहेत. त्यांच्यावर काय ईडीची कारवाई होणार . हे सगळं केवळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीची कमतरता त्यामुळे निर्माण झालेली दरी निर्माण झाली. अशावेळी एकमेव भेटणारा नेता होता शिंदेसाहेब. त्यामुळे त्यांच्याविषयीचं प्रेम वाढलं. त्यामुळं हे झालं, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा