“हर हर महादेव सिनेमा टीव्हीवर दाखवू नका, अन्यथा गंभीर परिणामांना तयार राहा”, संभाजीराजेंचा झी स्टुडिओला इशारा

| Updated on: Dec 04, 2022 | 3:33 PM

संभाजीराजेंचा झी स्टुडिओला इशारा...

हर हर महादेव सिनेमा टीव्हीवर दाखवू नका, अन्यथा गंभीर परिणामांना तयार राहा, संभाजीराजेंचा झी स्टुडिओला इशारा
Follow us on

मुंबई : ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) सिनेमावरून वाद सुरु असतानाच हा सिनेमा झी मराठीवर दाखवण्यात येणार आहे. या पाश्वभूमीवर संभाजीराजेंनी (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati) झी स्टुडिओला इशारा दिली आहे. “हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ (Zee Studios) जबाबदार असेल”, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल. हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजेंनी झी स्टुडिओला दिला आहे.

हर हर महादेव हा चित्रपटाचा 18 डिसेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर असणार आहे. हा सिनेमा टीव्हीवर दाखवला जाऊ नये, अशी भूमिका सध्या शिवभक्त घेताना दिसत आहेत.

हर हर महादेव सिनेमावरून मोठा वाद निर्माण झाला. या सिनेमात इतिहासाशी मोडतोड केल्याचा आरोप करण्यात आला. या सिनेमाचे थिएटरमधील शो बंद पाडण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनंतर या सिनेमाचे थिएटरमधील शो बंद करण्यात आले. आता हा सिनेमा टीव्हीवर दाखवण्यात येणार असल्याने संभाजीराजेंनी आक्षेप घेतला आहे.