पुणे आयुक्तांची बदली हे गलिच्छ राजकारण, काँग्रेस नेत्याचा अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

"शेखर गायकवाड यांची बदली केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. शेखर गायकवाडांच्या बदलीमागे मराठी अधिकारी विरुद्ध हिंदी अधिकारी असा वाद आहे" असा आरोप संजय बालगुडे यांनी केला.

पुणे आयुक्तांची बदली हे गलिच्छ राजकारण, काँग्रेस नेत्याचा अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

पुणे : पुण्याचे माजी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली आणि नव्या लॉकडाऊनवरुन आता महाविकास आघाडीत तेढ निर्माण झाल्याचे चित्र आहे. गायकवाडांची बदली राजकीय दबावातून केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला आहे. बालगुडेंनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Congress Leader Sanjay Balgude on Pune Municipal Commissioner Shekhar Gaikwad Transfer implicitly blames Deputy CM Ajit Pawar)

“शेखर गायकवाड यांची बदली केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. शेखर गायकवाडांच्या बदलीमागे मराठी अधिकारी विरुद्ध हिंदी अधिकारी असा वाद आहे” असा आरोप संजय बालगुडे यांनी केला.

“शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली झाली. मुळात त्यांची नेमणूक होऊन जेमतेम सात आठ महिने झाले. मार्चमध्ये कोरोना महामारी सुरु झाल्यापासून चार महिन्यात त्यांनी जेवढे शक्य आहे तेवढे प्रशासक म्हणून अतिशय उत्तम काम केले” असे बालगुडे यांनी पत्रात लिहिले आहे.

“पुण्यात अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे श्रेय शेखर गायकवाड यांना जाते. पालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकारणे त्यांनी काढली. एका कर्तबगार अधिकाऱ्याची बदली करणे हे गलिच्छ राजकारणाचे प्रतिक आहे. काही सत्ताधाऱ्यांना आयुक्त हे आपल्या ताटाखालचे मांजर असते, असे वाटणे योग्य नाही.” असेही बालगुडे म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“शेखर गायकवाड यांची बदली कोणाच्या दबावाखातर झाली आहे. त्यांच्या बदलीने राज्य सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. त्यांची बदली रद्द करुन पुन्हा पुणे पालिका आयुक्तपदी नेमणूक करावी” अशी मागणी संजय बालगुडे यांनी केली आहे.

नवा लॉकडाऊन कोरोनासाठी नव्हे तर विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यासाठी केल्याचा गंभीर आरोपही बालगुडे यांनी केला आहे. या संदर्भात संजय बालगुडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

दरम्यान, शेखर गायकवाड यांची परवाच पुणे पालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात आयुक्त भवनात विक्रम कुमार यांनी गायकवाड यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. सोमवार मध्यरात्रीपासून पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारीच विक्रम कुमार यांनी पदभार स्वीकारुन कामकाजाला सुरुवात केली.

संबंधित बातम्या :

कोरोना संपल्यावर मनमानी करा, पुणे पालिका आयुक्तांच्या बदलीवरुन गिरीश बापटांचा अजित पवारांना टोला

पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त

(Congress Leader Sanjay Balgude on Pune Municipal Commissioner Shekhar Gaikwad Transfer implicitly blames Deputy CM Ajit Pawar)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *