कोरोना संपल्यावर मनमानी करा, पुणे पालिका आयुक्तांच्या बदलीवरुन गिरीश बापटांचा अजित पवारांना टोला

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या बदलीचा विषय आता पेटला आहे (Girish Bapat on Pune Commissioner transfer).

कोरोना संपल्यावर मनमानी करा, पुणे पालिका आयुक्तांच्या बदलीवरुन गिरीश बापटांचा अजित पवारांना टोला

पुणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या बदलीचा विषय आता पेटला आहे (Girish Bapat on Pune Commissioner transfer). भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी या निर्णयाचा विरोध करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या विरोधात गरज पडल्यास आंदोलनाचाही इशारा दिला आहे. पुण्यातील कोरोना विरोधातील लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. अशा परिस्थितीत पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आली. या चुकीच्या निर्णयाचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

गिरीश बापट म्हणाले, “पालिका आयुक्त शेखर गायकवाड हे चांगलं काम करत होते. त्यामुळं या चुकीच्या निर्णयाचा मी निषेध करतो. त्याचबरोबर पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचाही निषेध करतो. यासंदर्भात वेळ पडल्यास आंदोलनाचाही मार्ग स्विकारु.” आपल्या हातात सत्ता असून कोरोना संपल्यानंतर आपण मनमानी कारभार करु शकता, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता लगावला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली आश्चर्यजनक आहे. एकतर्फी लॉकडाऊन आणि त्यानंतर आयुक्तांची बदली करण्यात आलीय. एकीकड राजकारण करु नका, असं म्हणतात. मात्र, आता कोण राजकारण करतोय हे पुणेकरांना दिसत असल्याचं म्हणत बापट यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

शेखर गायकवाड हे आयुक्त म्हणून चांगलं काम करत होते. पुणे शहराची माहिती आवाका आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना राबवत होते. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. मात्र हा निर्णय चुकीचा असून पुणेकरांचं नुकसान होणार आहे. यामुळं कोरोना प्रतिबंधात्मक मोहीम थोडीशी शिथिल पडेल, असा दावाही बापट यांनी केलाय.

हेही वाचा :

अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा काय करायचं हे आम्ही ठरवू : गिरीश बापट

बापट म्हणाले, अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, रुपाली चाकणकर म्हणतात, मोदींना सांगा

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर निर्णय

BREAKING | पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन

Girish Bapat on Pune Commissioner transfer

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *