AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापट म्हणाले, अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, रुपाली चाकणकर म्हणतात, मोदींना सांगा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला आहे (Rupali Chakankar criticize Girish Bapat).

बापट म्हणाले, अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, रुपाली चाकणकर म्हणतात, मोदींना सांगा
| Updated on: Jul 11, 2020 | 5:34 PM
Share

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी अजित पवार यांचा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप करत थेट इशारा दिला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला (Rupali Chakankar criticize Girish Bapat). लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्या, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

गिरीश बापट यांनी पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केल्याचा आरोप केला. तसेच असे निर्णय होत राहिले तर आम्ही यापुढे काय करायचं हे ठरवू, असा इशारा अजित  पवार यांना दिला. यावर रुपाली चाकणकर यांनी बापट यांनी हीच हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही विश्वासात न घेता पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा दाखवायला पाहिजे होती, असं म्हणत टोला लगावला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत गिरीष बापट यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, “गिरीश बापट यांनी हीच हिम्मत मोदींनी कुणालाच विश्वासात न घेता लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा दाखवायला पाहिजे होती.”

पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर भाजप खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला. “पालकमंत्री अजित पवार यांनी फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले नाही. ‘हम करे सो कायदा’ असून हे बरोबर नाही. केवळ 4 टक्के बाधित रुग्णांसाठी 96 टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचं आहे. असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचं हे आम्ही ठरवू”, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला. (Girish Bapat opposes Ajit Pawar decision about Pune lockdown)

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी होऊ शकते. मात्र त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. केवळ दिवस पुढे ढकलल्याने संख्या कमी होणार नाही. सर्व पुणे शहराला वेठीस धरले जात आहेत”, असं गिरीश बापट म्हणाले. (Girish Bapat slams Ajit Pawar)

“या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार पुन्हा बुडणार आहे. सरकारनं बारा बलुतेदारांना काहीच पॅकेज दिलं नाही. यामुळे उपासमारीची भीती असून, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे”, असं बापट यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

 पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन   

भाजीपाला भरुन ठेवा, खरेदी असेल ती करुन घ्या, पुणे-पिंपरीत कडक लॉकडाऊन 

Rupali Chakankar criticize Girish Bapat

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.