AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा काय करायचं हे आम्ही ठरवू : गिरीश बापट

पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र भाजप खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. Girish Bapat opposes Pune Lockdown

अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा काय करायचं हे आम्ही ठरवू : गिरीश बापट
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 11, 2020 | 1:57 PM
Share

पुणे: पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र भाजप खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. “पालकमंत्री अजित पवार यांनी फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले नाही. हम करे सो कायदा असून हे बरोबर नाही. केवळ चार टक्के बाधित रुग्णांसाठी 96 टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचं आहे. असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचं हे आम्ही ठरवू”, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला. (Girish Bapat opposes Ajit Pawar decision about Pune lockdown )

“कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी होऊ शकते. मात्र त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. केवळ दिवस पुढे ढकलल्याने संख्या कमी होणार नाही. सर्व पुणे शहराला वेठीस धरले जात आहेत”, असं गिरीश बापट म्हणाले. (Girish Bapat slams Ajit Pawar)

“या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार पुन्हा बुडणार आहे. सरकारनं बारा बलुतेदारांना काहीच पॅकेज दिलं नाही. यामुळे उपासमारीची भीती असून, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे”, असं बापट यांनी सांगितलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“लॉकडाउन जाहीर करताना खासदार आमदारांच्या सूचना विचारल्या नाहीत. केंद्रात नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं, त्यांचा सल्ला घेतला. मात्र तसं पुण्यात होत नसून, मनमानी कारभार असल्याचा आरोप बापट यांनी केला.

यामुळं लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल. लोकं ऐकत नसेल तर दंडात्मक कारवाई करा. मात्र दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. जीव जसा महत्वाचा आहे त्यानुसार जीवन सुद्धा महत्वाचं आहे. असे एकतर्फी निर्णय घेतले तर आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा बापट यांनी दिला.

(Girish Bapat opposes Ajit Pawar decision about Pune lockdown )

संबंधित बातम्या 

 पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन   

भाजीपाला भरुन ठेवा, खरेदी असेल ती करुन घ्या, पुणे-पिंपरीत कडक लॉकडाऊन 

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...