पुण्याच्या नवनियुक्त पालिका आयुक्तांनी 24 तासात पदभार स्वीकारला, विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडमध्ये

पहिल्याच दिवशी विक्रम कुमार यांनी पालिका प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत आरोग्य विभागावर जास्त भर देण्यात आला. (Pune Municipal Commissioner Vikram Kumar takes charge)

पुण्याच्या नवनियुक्त पालिका आयुक्तांनी 24 तासात पदभार स्वीकारला, विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडमध्ये

पुणे : पुण्याचे नवनियुक्त महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पदभार स्वीकारला. पुण्यात उद्या (सोमवार 13 जुलै) मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होणार असल्याने रविवारच्या दिवशीच विक्रम कुमार यांनी पालिकेचा चार्ज घेतला. (Pune Municipal Commissioner Vikram Kumar takes charge)

शेखर गायकवाड यांची कालच पुणे पालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात आयुक्त भवनात विक्रम कुमार यांनी गायकवाड यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सोमवार मध्यरात्रीपासून पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारीच विक्रम कुमार यांनी पदभार स्वीकारुन कामकाजाला सुरुवात केली.

विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी पालिका प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. सर्व विभागप्रमुखांकडून त्यांनी सद्यस्थिती जाणून घेतली. बैठकीत आरोग्य विभागावर जास्त भर देण्यात आला.

अद्यापपर्यंत या लॉकडाऊनची नियमावली जाहीर झालेली नाही. नियमावलीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. पुण्यातील दहा दिवसाच्या लॉकडाऊनची नियमावली आज रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव निर्णायक टप्प्यात आहे, अशी परिस्थिती असतानाच शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या प्रकरणावरुन विरोधकांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कोरोना प्रादुर्भाव सुरु असताना राजकीय वातावरणही तापू लागले. त्यामुळे विक्रम कुमार यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून राजकीय समतोल साधण्याची दुहेरी कसरत करावी लागणार आहे.

शेखर गायकवाड साखर आयुक्तपदी

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. शेखर गायकवाड यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्ये शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. शेखर गायकवाड यांच्याव्यतिरिक्त आणखी 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन असेल.


संबंधित बातम्या :

कोरोना संपल्यावर मनमानी करा, पुणे पालिका आयुक्तांच्या बदलीवरुन गिरीश बापटांचा अजित पवारांना टोला

पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त

(Pune Municipal Commissioner Vikram Kumar takes charge)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *