AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या ‘हायपरलूप’ला अजित पवारांचा रेड सिग्नल

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वकांक्षी हायपरलूप प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेड सिग्नल दिला (Hyperloop project work stop) आहे.

फडणवीसांच्या 'हायपरलूप'ला अजित पवारांचा रेड सिग्नल
| Updated on: Jan 17, 2020 | 7:17 PM
Share

पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वकांक्षी हायपरलूप प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेड सिग्नल दिला (Hyperloop project work stop) आहे. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. “जगात अजून कुठेही हायपरलूप रेल्वे नाही. आधी कुठे तरी होऊ द्या मग आपल्याकडे बघू,” असे सांगत अजित पवारांनी हायपरलूपच्या सर्वेक्षणाच्या कामाला ब्रेक दिला आहे.

“हायपरलूप संदर्भात अद्याप चर्चा नको. आधी ही रेल्वे जगात कुठंतरी होऊ द्या. याची ट्रायलही आपल्याकडे नको,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केलं. पुण्यात आज विविध विषयासंदर्भात अजित पवारांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुणे मेट्रो, पीएमआरडीए, पालखी मार्ग आढावा, आणि शिवजयंती आयोजन यावर चर्चा केली.

पुढील काही दिवसात पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी पहाटे साडे पाच वाजता करणार अशा सूचना अजित पवारांनी आजच्या बैठकीत दिला आहे. त्यामुळे अधिकारी खऱ्या अर्थाने कामाला लागले (Hyperloop project work stop) आहेत.
हायपरलूप प्रकल्प नेमका काय?
फडणवीस सरकारने घोषणा हायपरलूप प्रकल्पाची घोषणा केली होती. यामुळे मुंबईहून अवघ्या अर्ध्या तासात पुणे गाठण्याचं स्वप्न येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहे. विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’ (Hyperloop) च्या माध्यमातून ही दोन शहरं केवळ 31 मिनिटांच्या अंतरावर असतील. महाराष्ट्र राज्य सरकारने ‘वर्जिन हायपरलूप’ (Virgin Hyperloop ) आणि ‘डीपी वर्ल्ड’ (DP World) यांच्या कराराला मान्यता दिली होती. महत्त्वाकांक्षी असा जगातील पहिला हायपरलूप ट्रॅक मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान सुरु होण्यापूर्वी त्याला ब्रेक लागला आहे.

हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत तर होणार आहे. मात्र हजारो तरुणांना हाय-टेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. 36 बिलियन डॉलर म्हणजेच (अंदाजे 2 लाख 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) आर्थिक नफा होईल, असाही अंदाज वर्तवला जात होता.

हायपरलूप म्हणजे नेमकं काय?

‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या एलन मस्क यांनी हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली. हायपरलूप वाहतूक व्यवस्थेसाठी कमी दाबाचा चॅनेल किंवा बोगदा तयार करायचा. अगदी कमी हवेच्या घर्षणासह खास डिझाइन केलेल्या ‘पॉड’मधून (ट्रेनसदृश) वाहतूक करायची. हे पॉड चाकांवर नव्हे तर हवेवर धावतील.

हायपरलूप व्यवस्था निर्माण करणं वाटतं तितकंही सोपं नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याच शहराला यश मिळालेलं नाही. अबुधाबी आणि चीनमधील गिझाऊ प्रांताने ‘एचटीटी’ कंपनीची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. यूएसमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील हायपरलूप प्रकल्प मंदगतीने सुरु आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.