मूकबधीरांच्या मोर्चाला राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट

पुणे : पोलिसांनी कर्णबधीरांच्या मोर्चावर लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली. कर्णबधीरांकडून पुण्यातील समाज कल्याण कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. पण पोलिसांकडून मोर्चा अडवण्यात आला आणि त्यांच्यावर लाठीचार्जला सुरुवात केली. शिवाय 60 ते 70 तरुणांना ताब्यातही घेण्यात आलंय. समाज कल्याण कार्यालयासमोर अजूनही या तरुणांचं आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मनसे […]

मूकबधीरांच्या मोर्चाला राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

पुणे : पोलिसांनी कर्णबधीरांच्या मोर्चावर लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली. कर्णबधीरांकडून पुण्यातील समाज कल्याण कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. पण पोलिसांकडून मोर्चा अडवण्यात आला आणि त्यांच्यावर लाठीचार्जला सुरुवात केली. शिवाय 60 ते 70 तरुणांना ताब्यातही घेण्यात आलंय. समाज कल्याण कार्यालयासमोर अजूनही या तरुणांचं आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलकांची पुण्यात भेट घेतली.

सकाळपासून अन्नाचा कणही न खाता हे तरुण आंदोलन करत आहेत. हे फडणवीस सरकार नसून जनरल डायर सरकार आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केलाय. सरकारकडून अत्यंत असंवेदनशीलता दाखवण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि मागण्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

राज ठाकरेंनीही आंदोलकांशी संवाद साधला. मूकबधीरांवर अशा प्रकारे अत्याचार करणं अत्यंत दुर्दैवी आहे. लाठीचार्जचा आदेश देणाराची चौकशी करावी, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. आंदोलकांना सर्व प्रकारची मदत करण्याबाबत स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना सांगितलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.

पुण्यातील समाज कल्याण कार्यालयात जाऊन हे तरुण आणि तरुणी त्यांच्या मागण्या मांडणार होते. त्यानंतर मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं पत्र दिलं जाणार होतं. त्याअगोदरच पोलिसांनी अडवणूक करत या दिव्यांगांवर अमानुषपणे लाठीचार्च केलाय. या मारहाणीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.

आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा करत होतो, पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप या मोर्चेकऱ्यांनी केलाय. दिव्यांगांना पोलिसांकडून मारहाण केली जाऊ शकत नाही, तरीही पोलिसांनीच कायदा हातात घेत मारहाण केल्याचा आरोप दिव्यांगांनी केलाय. मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन विविध ठिकाणी ठेवण्यात आलंय.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन स्थळ सोडणार नाही, असा पवित्रा या मोर्चेकऱ्यांनी घेतला. जवान जसे देशासाठी शहीद होतात, तसे आम्हीही आमच्या मागण्यांसाठी प्राणाची आहुती देऊ, असंही मोर्चेकऱ्यांनी म्हटलंय. यापूर्वीही अनेकदा मागण्यांचा पाठपुरावा केला, पण अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप मोर्चेकऱ्यांचा आहे.

काय आहेत मागण्या?

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील मूक बधिरांच्या अनुशेष भरतीचा फेर आढावा घेवून पद भरती करण्यात यावी

दिव्यांगासाठी मोफत घरकुल देण्यात यावे

कर्ज योजना आणि बँकांकडून होणारी दिव्यांगाची अडवणूक थांबविण्यात यावी

मूक बधिरांना दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड देण्यात यावे

संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करून ते एक हजार रुपये करून मूक बधीर कुटुंब प्रमुखास दारिद्र्य रेषेचे कार्ड आणि घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा यासह इतर मागण्या

व्हीडिओ पाहा :

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.