पुण्यात बाथरुममध्ये अडकून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

पुणे : अंघोळ करत असताना बाथरूममध्ये दोन लहान भावांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. दरवाजा बंद असल्याने तयार झालेल्या वायूमुळे दोघेही बेशुद्ध पडले. उपचारासाठी घोडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केलं. अभिषेक नवनाथ पांडे (वय 16) आणि आदित्य नवनाथ पांडे (वय 12) अशी मृत मुलांची नावं आहेत. प्रजासत्ताक दिन असल्याने …

पुण्यात बाथरुममध्ये अडकून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

पुणे : अंघोळ करत असताना बाथरूममध्ये दोन लहान भावांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. दरवाजा बंद असल्याने तयार झालेल्या वायूमुळे दोघेही बेशुद्ध पडले. उपचारासाठी घोडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केलं. अभिषेक नवनाथ पांडे (वय 16) आणि आदित्य नवनाथ पांडे (वय 12) अशी मृत मुलांची नावं आहेत.

प्रजासत्ताक दिन असल्याने अभिषेक आणि आदित्य एकत्र आंघोळीला गेले. एकत्र आंघोळ करुन दोघेही प्रजासत्ताक दिनासाठी तयार होणार होते. पण काळाला वेगळंच काही मान्य होतं. बाथरुममध्ये विषारी वायू तयार झाला आणि या दोघांचाही मृत्यू झाला.

एकीकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळांमध्ये मुलांची लगबग सुरु होती. तर दुसरीकडे पांडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली होती. प्रजासत्ताक दिनाला जाण्याअगोदरच या भावांवर काळाने घाला घातला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *