Astrology 2026: 5 सप्टेंबरला शुक्र आणि चंद्राची खास युती, नवपंचम योगामुळे चार राशींचं नशिब फळफळणार

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर लक्ष ठेवलं जातं. कारण ग्रहस्थितीवरून अंदाज बांधला जातो. 5 सप्टेंबरला ज्योतिषाशास्त्रात अशीच घडामोड घडणार आहे. त्यामुळे चार राशींना लाभ मिळणार आहे.

Astrology 2026: 5 सप्टेंबरला शुक्र आणि चंद्राची खास युती, नवपंचम योगामुळे चार राशींचं नशिब फळफळणार
Astrology 2026: 5 सप्टेंबरला शुक्र आणि चंद्राची खास युती, नवपंचम योगामुळे चार राशींचं नशिब फळफळणार
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 04, 2026 | 7:52 PM

ज्योतिषशास्त्रानुसार 5 सप्टेंबर 2026 हा दिवस खास असणार आहे. या दिवशी शुक्र आणि चंद्र या ग्रहांची खास युती असणार आहे. त्यामुळे नवपंचम योग तयार होणार आहे. ज्योतिषाशास्त्रानुसार हा एक शुभ योग असणार आहे. चंद्र ग्रह 5 सप्टेंबरला सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीच शुक्र ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे नवपंचम योग तयार होणार आहे. इतकंच काय तर ‘सिद्धी योग’ आणि ‘मृगशिरा नक्षत्राचा’ एक असा दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. आर्थिक लाभापेक्षाही मानसिक शांती, अध्यात्म आणि अडकलेल्या कामांना गती देण्यासाठी अत्यंत विशेष आहे. या स्थितीचा लाभ चार राशीच्या जातकांना होणार आहे.

या राशीच्या जातकांना मिळणार लाभ

मिथुन : चंद्र आणि शुक्राच्या युतीमुळे नवपंचम योग तयार होत आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या जातकांना चांगला लाभ होऊ शकतो. चंद्र याच राशीत प्रवेश करणार असून अडीच दिवस ठाण मांडेल. त्यामुळे या कालावधीत करिअर आणि शिक्षण क्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील. काही लोकांना मनासारखी नोकरी मिळू शकते. इतकंच काय तर नशीबाचीही पूर्ण साथ मिळेल. या काळात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल.

सिंह: नवपंचम योगावेळी चंद्र या राशीच्या एकादश भावात असणार आहे. तर शुक्र ग्रह पराक्रम भावात असेल . त्यामुळे या राशीच्या जातकांना उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात. कौटुंबिक पातळीवरही चांगले परिणाम दिसून येतील. चांगल्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे मानसिक स्थिती या काळात कमालीची सुधारलेली असेल.

तूळ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र याच राशीत विराजमान आहे. तर चंद्र नवव्या स्थानात गोचर करणार आहे. त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. गेल्या काही दिवसापासून अडकलेली कामं या काळात पूर्ण करता येतील. नवं वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याचा योग जुळून येईल. कौटुंबिक पातळीवर सकारात्मक परिणाम दिसतील.

कुंभ : या राशीच्या जातकांवर शुक्र आणि चंद्राची स्थिती अनुकूल परिणाम देणार आहे. मागच्या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. इतकंच काय तर स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. समाजात मानसन्मान प्राप्त होईल.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us