700 वर्षानंतर दिवाळीला जुळून आले 5 राजयोग, या राशींना मिळणार नशिबाची साथ

ज्योतिषशास्त्र हे पूर्णत: ग्रहांची स्थिती आणि शुभ अशुभ योगांवर आधारित आहे. राशीचक्रातील कोणत्या राशींना लाभ मिळणार यावरून गणित बांधलं जातं. दिवाळीला असेच 5 राजयोग जुळून आले आहेत. त्यामुळे चार राशींना लाभ मिळणार आहे.

700 वर्षानंतर दिवाळीला जुळून आले 5 राजयोग, या राशींना मिळणार नशिबाची साथ
700 वर्षानंतर दिवाळीला 5 शुभ योग. चार राशींचं नशीब फळफळणार
| Updated on: Nov 08, 2023 | 8:45 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि योग प्रत्येक जुळून तसेच जुळून येतील असं नाही. काही योग पुन्हा जुळून येण्यासाठी शेकडो वर्षांना कालावधी लागतो. यंदाच्या दिवाळीत अशीच काहीशी स्थिती आहे. पंचांगानुसार, 700 वर्षानंतर 5 राजयोग दिवाळीला जुळून आले आहेत. यात गजकेसरी, हर्ष, उभयचरी, काहल आणि दुर्धरा योगांचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्रात हे योग अत्यंत शुभ मानले जातात. त्यामुळे या शुभ योगांचा राशीचक्रावर सकारात्मक परिणाम पडेल. काही राशींना या फळ अधिक मिळेल. तर काही राशींना थोडक्यावर समाधान मानावं लागेल. पण असं असलं तरी वैयक्तिक कुंडलीतील ग्रहमानही तितकंच अनुकूल असायला हवं. चला जाणून घेऊयात शुभ योगाचा कोणत्या राशींना लाभ मिळणार ते..

या राशींना मिळणार लाभ

मेष : नुकताच राहुने मीन राशीत प्रवेश केल्याने चांडाळ योगातून सुटका झाली आहे. त्यामुळे 5 राजयोगांचा लाभ मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होतील. पण वादापासून दूर राहिलेलं बरं राहील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल.

मिथुन : राशीचक्रातील भौतिक सुखांची अनुभूती घेणारी ही रास आहे. या कालावधीत प्रॉपर्टी संदर्भातील व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण कराल. यात नक्कीच फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही संधी चालून येतील. पण पगार आपल्या आकडेमोडीशी जुळून येतो का ते एकदा पडताळून पाहा.

कन्या : आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा कालावधी आहे. काही विपरीत घटनांवर मात मिळवाल. आर्थिक नुकसान दूर करण्यास मदत मिळेल. बचतीकडे लक्ष द्या. विनाकारण पैसा खर्च होणार नाही, याची काळजी घ्या. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नात्यात व्यवहार करणं शक्यतो टाळा.

मकर : या राशीच्या जातकांना दिवाळी एकदम मस्त जाईल, असं ग्रहमान आहे. ठरवलेली कामं पूर्ण होतील. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा भास होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल. काही किचकट कामं पूर्ण कराल. व्यवसाय वाढवण्यासाठी उत्तम कालावधी राहील. समाजात मानसन्मान मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)