AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aquarius/Pisces Rashifal Today 12 July 2021 | महत्त्वाची कामे मार्गी लागणार, पण अतिआत्मविश्वास घातक, तर मीन राशीच्या तरुणांना प्रेमात यश मिळणार

दुपारनंतर अप्रत्यशरित्या लाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली चांगली कामं आणि क्षमतेनुसार महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे

Aquarius/Pisces Rashifal Today 12 July 2021 | महत्त्वाची कामे मार्गी लागणार, पण अतिआत्मविश्वास घातक, तर मीन राशीच्या तरुणांना प्रेमात यश मिळणार
kumbh-meen
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 12, 2021 | 12:14 AM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : सोमवार 12 जुलै 2021 (Aquarius/Pisces) | प्रत्येकालाच आपला दिवस आनंदात, सुखात जावा असे वाटते. मात्र, या गोष्टी प्रत्यक्षात घडतातचं असे नाही. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या सोमवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aquarius/Pisces daily horoscope of 12 july 2021 kumbha and meen rashifal today)

कुंभ राश‍ी (Aquarius), 12 जुलै :

तुम्हाला दुपारनंतर अप्रत्यशरित्या लाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली चांगली कामं आणि क्षमतेनुसार महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कोर्ट कचेरीसंबंधित कामांमध्ये आज चांगला फायदा होऊ शकतो. कारण आजच्या दिवशी निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रयत्नशील राहा.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास ! आत्मविश्वास हा जरुरीचा आहे. पण अतिआत्मविश्वास कदाचित तुमचं नुकसान करु शकतो. त्यामुळे अतिआत्मविश्वास नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या स्वभावात नेहमीप्रमाणे मऊपणा, विनम्रपणा राहिल्यास त्याचा तुम्हाला योग्य फायदा होईल. त्यामुळे तुम्हाला समाजात वावरताना मान-सन्मानात कोणतीच कमतरता येणार नाही.

व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तर मार्केटिंग क्षेत्राचं काम पुढे ढकला. कारण प्रतिस्पर्धीमुळे तुमचा तोटा होण्याची जास्त शक्यता आहे. सध्या व्यवसायात चांगले यश संपादित करण्यासाठी अधिक मेहनतीची जास्त आवश्यकता आहे.

लव्ह फोकस – प्रेम संबंधामध्ये नाते चांगले राहील. वैवाहित जीवनही सुखमय राहील.

खबरदारी : जास्त थकवा आणि तणावामुळे हार्मोन्स संबंधित समस्या उद्भवू शकतात. योगा, मेडिटेशन केल्यास तुम्ही स्वस्थ राहू शकता.

लकी कलर – क्रीम लकी अक्षर –फ्रेंडली नंबर – 8

मीन राश‍ी (Pisces), 12 जुलै :

कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले मतभेद, गैरसमज अखेर तुमच्या हस्तक्षेपामुळे दूर होतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरण शांत, सामान्य, सुखद आणि समाधानी असं राहील. वडिलधारांचा सल्ला आपल्यासाठी हिताचा राहील. पण एखाद्या नकारात्मक गोष्टीमुळे आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम पडू शकतो. सध्याच्या घडीला पॉझिटिव्ह राहणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करा. अध्यात्मिक पूजा वैगेर केल्यास तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.

वैयक्तीक कामांमुळे ऑफिस आणि व्यवसायात पू्र्ण वेळ देता येणार नाही. पण इतर सहकाऱ्यांच्या साथीमुळे काम पूर्ण होईल. व्यवसायात जास्त फायदा मिळेल असा विचार सध्या तरी करु नका. पण प्रयत्न सुरु ठेवा. भविष्यात नक्कीच यश मिळेल. नोकरदार मंडळी आपलं टार्गेट पूर्ण करु शकतील.

लव्ह फोकस : घरात सुखद वातावरण तयार करण्याच्या तुमच्या प्रयत्नाला यश येईल. प्रेम/प्रेमिका यांना डेटिंगसाठी संधी मिळेल.

लकी रंग : पांढरा लकी अक्षर :फ्रेंडली नंबर : 9

Aquarius/Pisces daily horoscope of 12 july 2021 kumbha and meen rashifal today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.

हेही वाचा : Libra/Scorpio Rashifal Today 12 July 2021 | घराचं वातावरण पॉझिटिव्ह ठेवण्यात तुमचं महत्त्वपूर्ण योगदान

Follow Us
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...