Aries/Taurus Rashifal Today 21 September 2021 | भाग्य तुमच्या बाजूने आहे, मित्रांशी काही कारणास्तव वाद होण्याची शक्यता

| Updated on: Sep 21, 2021 | 12:05 AM

मंगळवार 21 सप्टेंबर 2021 (Aries/Taurus Rashifal). मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल.

Aries/Taurus Rashifal Today 21 September 2021 | भाग्य तुमच्या बाजूने आहे, मित्रांशी काही कारणास्तव वाद होण्याची शक्यता
Aries_Taurus
Follow us on

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 21 सप्टेंबर 2021 (Aries/Taurus Rashifal). मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या मंगळवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aries/Taurus Daily Horoscope Of 21 September 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today) –

मेष राश‍ी (Aries)

काही उपयुक्त महत्वाची माहिती मिळाल्याने मनामध्ये आनंद राहील. यावेळी भाग्य तुमच्या बाजूने आहे. धर्म, कर्म आणि अध्यात्मावर विश्वास ठेवा, यामुळे मनामध्ये शांती राहील आणि सकारात्मक उर्जा प्रसारित होईल.

बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. मित्रांशी काही कारणास्तव वाद होऊ शकतात, आपला राग नियंत्रणात ठेवा. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून विचलित होऊ शकते, मित्रांबरोबर प्रवास करण्यात वेळ वाया घालवू नका.

व्यवसायिक क्रिया मंदावतील. आजचा दिवस पेमेंट वगैरे करण्यात खर्च होईल आणि आर्थिक स्थितीही मजबूत होईल. नोकरदार व्यक्तींना कोणत्याही बदलाशी संबंधित माहिती मिळू शकते.

लव्ह फोकस – पती-पत्नीचे सहकार्य एकमेकांना आनंदी आणि शांत ठेवेल. पण मुलांची कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.

खबरदारी – आरोग्य ठीक राहील. पण, बदलत्या वातावरणामुळे निष्काळजी होऊ नका. दिनक्रम व्यवस्थित ठेवा.

लकी रंग – लाल
लकी अक्षर- प
फ्रेंडली नंबर- 3

वृषभ राश‍ी (Taurus)

आज तुम्ही आराम करण्याच्या आणि कुटुंबासोबत दिवस घालवण्याच्या मनःस्थितीत असाल. जर गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही योजना बनवली जात असेल तर त्यावर त्वरित काम करा. आर्थिक दृष्टिकोनातून परिस्थिती अनुकूल आहे. घर बदलण्याशी संबंधित कोणतेही काम देखील शक्य आहे.

आळसामुळे काही कामात अडथळा येऊ शकतो. आणि वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित कोणत्याही विषयावर भावांशी वाद होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही तुमच्या योग्य वागण्याने परिस्थिती हाताळाल.

व्यवसायातील कोणत्याही नवीन कामाशी संबंधित पहिला पेमेंट येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मनामध्ये आनंद राहील. नोकरदार व्यक्तींना हस्तांतरणाशी संबंधित कोणतीही माहिती मिळेल जी तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल.

लव्ह फोकस – विवाहबाह्य प्रेम संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे, परंतु हे लक्षात ठेवा की यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात.

खबरदारी – तुम्हाला बद्धकोष्ठता आणि मूळव्याध असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

लकी रंग – पांढरा
लकी अक्षर- न
फ्रेंडली नंबर- 1

Aries/Taurus Daily Horoscope Of 21 September 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | निष्ठावान, संवेदनशील आणि दृढ निश्चयी असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या त्यांच्याबाबत

Zodiac Signs | या 3 राशीच्या व्यक्ती स्वत:वर प्रेम करतात आणि स्वत:ला पसंत करतात