Astrology 2025 : 12 मे रोजी ग्रह सेनापती मंगळ करणार स्थान बदल, गोचरामुळे जातकांना मिळणार लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. त्याचा कमी अधिक प्रमाणात राशीचक्रावर परिणाम होत असतो. ग्रहमंडळात सेनापतीची दर्जा असलेला मंगळ ग्रह स्थान बदल करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भलं होणार आहे. चला जाणून घेऊयात

Astrology 2025 : 12 मे रोजी ग्रह सेनापती मंगळ करणार स्थान बदल, गोचरामुळे जातकांना मिळणार लाभ
मंगळ ग्रह
| Updated on: May 03, 2025 | 6:35 PM

कुंडलीत मंगळाची स्थिती योग्य असेल तर ती व्यक्ती साहसी, ऊर्जा आणि शक्तीने भरलेली तसेच पराक्रमी असते मंगळ हा ग्रह मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती संबोधलं जातं. मे महिन्यात मंगळ ग्रह आपल्या स्थितीत बदल करणार आहे. 12 मे 2025 रोजी मंगळ ग्रह सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी गोचर करणार आहे. मंगळ ग्रह 7 जून 2025 पर्यंत आश्लेषा नक्षत्रात राहील. कर्क रास ही आश्लेषा नक्षत्राचा स्वामी मानले जाते. तसेच आश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध ग्रहआहे. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, भाषण, व्यवसाय आणि संवाद नियंत्रित करते. मंगळाच्या या उर्जेचा प्रभाव पडेल. या संक्रमणामुळे कौटुंबिक नात्यातही गोडवा येईल. हा बदल काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांचे नशीब बदलेल.

या राशींना मिळणार लाभ

मिथुन : या राशीसाठी मंगळाचं गोचर फायदेशीर ठरेल. या कालावाधीत आर्थिक स्थिती सुधारेल आणि गुंतवणुकीचे मार्ग खुले होतील. कौटुंबिक नात्यातही गोडवा येईल. या राशीच्या लोकांसाठी हा काळ पूर्णपणे अनुकूल असेल आणि जीवनात आनंद राहील. पण या कालावधीत आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण एखादी चुकीची गोष्ट भविष्यात महागात पडू शकते.

तूळ : या राशीसाठीही हे मंगळाचे भ्रमण शुभ राहील. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक पातळीवर काही सकारात्मक बदल दिसतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डोक्यावर असलेला ताण कमी होईल. जातकांचे आरोग्य देखील सुधारेल.

मकर : या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायद्याचं ठरणार आहे. या संक्रमणात उत्पन्नाचे नवे स्रोत उत्पन्न होतील. व्यवसाय असो किंवा नोकरी दोन्हीमध्ये नफा मिळण्याची शक्यता असते. या लोकांना आरोग्य आणि आर्थिक स्थितीतही फायदा होईल. तसेच हाती घेतलेली कामं चुटकीसरशी पूर्ण होतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)