
ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं गेलं आहे. त्यामुळे शनिदेवांची स्थिती ज्योतिषशास्त्रानुसार खूपच महत्त्वाची ठरते. सध्या शनिदेव मीन राशीत विराजमान आहेत. कुंभ राशीला शेवटची, मीन राशीला मधली आणि मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. 13 जुलैला शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहे. शनिमहाराजांची वक्री स्थिती राशीचक्रात खूप महत्त्वाची घडामोड आहे. शनिदेव 138 दिवस वक्री असणार आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत शनि देव मार्गस्थ होणार आहेत. शनिदेवांची वक्री स्थिती राशीचक्रावर परिणाम करणार आहे. या दरम्यान काही राशींना सांभाळून राहणं महत्त्वाचं आहे. खासकरून चार राशींनी या कालावधीत सावध राहणं आवश्यक आहे.
मेष : या राशीच्या पहिल्या टप्प्यात शनिदेव आहेत. म्हणजेच साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. असं असताना शनि महाराजांच्या वक्री स्थितीत सांभाळून राहणं आवश्यक आहे. मेष राशीच्या जातकांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. काम करताना काळजी विशेष काळजी घ्या.
मिथुन : या राशीच्या जातकांना 138 दिवस सावध राहणं गरजेचं आहे. शनि महाराजांची वक्री स्थिती या राशीच्या जातकांवर प्रभाव टाकेल. या कालावधीत वाद होणार नाही याची काळजी घ्या. या काळात अडचणींचा डोंगर उभा राहील. पण लक्षपूर्वक काम करत राहा.
सिंह : या राशीच्या जातकांना सावध राहणं गरजेचं आहे. खासकरून प्रवास करताना काळजी घ्या. वाहन चालवताना घाई करू नका. सावध राहा आणि नियमांचं पालन करा. कुटुंबात कलह होणार नाही याची काळजी घ्या.
धनु : या राशीच्या जातकांना शनि महाराजांची वक्री चाल त्रासदायक ठरेल. प्रत्येक काम करताना काळजीपूर्वक करा. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी संयम ठेवावा. आरोग्याची काळजी घ्यावी. शनि मंदिरात जाऊन पूजा करा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)