Astrology 2025 : सूर्याचा चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश, या राशींना मिळणार बळ

ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्यातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे सूर्याचं गोचर.. सूर्याच्या गोचरामुळे राशीचक्रात उलथापालथ होणार यात काही शंका नाही. कारण सूर्य हा मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे.

Astrology 2025 : सूर्याचा चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश, या राशींना मिळणार बळ
Astrology 2025 : सूर्याचा चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश, या राशींना मिळणार बळ
| Updated on: Jul 16, 2025 | 9:40 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव हा ग्रहांचा राजा आहे आणि त्यांच्या अधिपत्याखाली ग्रहमंडळ चालतं. सर्व ग्रह सूर्याच्या भोवती फिरत असतात. त्यामुळे ग्रहांचा उदय आणि अस्त त्यांच्या तेजावर अवलंबून असतो. असं असताना सूर्यदेव दर महिन्याला राशी बदल करतात. त्यांच्या राशी बदलला संक्रांत असं म्हंटलं जातं. सूर्यदेव आता मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. ही चंद्राचं अधिपत्य असलेली रास आहे. त्यामुळे पुढचे 30 दिवस राशी चक्रात बदल दिसून येतील. सूर्याच्या या गोचराला कर्क संक्रांती असं म्हंटलं जातं. सूर्याच्या या गोचरामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या आहेत त्या…

कन्या : सूर्यदेव या राशीच्या एकादश स्थाना येणार आहेत. यामुळे या राशीच्या उत्पन्नात येत्या काही दिवसात वाढ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच या काळात पैशांची बचत होईल आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. व्यवसायिकांना हा काळ खूपच अनुकूल असेल. या काळात एखादा मोठा करार निश्चित करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळू शकते. एकंदरीत अडकलेली कामं मार्गी लागतील.

तूळ : या राशीच्या दहाव्या स्थानात सूर्य असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल. या काळात जातकांना नवी नोकरी मिळू शकते. नव्या कामाची सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. त्यामुळे या काळात एखादी सुरुवात करू शकता. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क : या राशीतच सूर्यदेव प्रवेश करणार आहे. लग्न स्थान असल्याने या राशीच्या जातकांचा आत्मविश्वास दुणावलेला राहील. तुमच्या शब्दाला मान असेल. तसेच समाजात तुम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. भागीदारीच्या धंद्यात तुम्हाला चांगलं यश मिळू शकते. लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना चांगले प्रस्ताव येऊ शकतात. सूर्याचं पाठबळ असल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)