18 वर्षानंतर मंगळ आणि बुधाचा दुर्मिळ योग, या राशींची होणार आर्थिक प्रगती
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. त्यानुसार ग्रहांची स्थिती बदलत असते. अनेकदा एका राशीत ग्रहांचा मेळ होण्यासाठी शेकडो वर्षांचा काळ जातो. त्यामुळे ग्रहांची युती आणि राशी हे खूप महत्त्वाचं ठरतं.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचराचा राशीचक्रावर परिणाम होत असतो. राशीचक्रातील रास मानवाशी निगडीत सांगितल्या जातात. त्यामळे त्याचा परिणाम पृथ्वीतल आणि मानवी जीवनावर होतो. 12 राशी आणि 27 नक्षत्रात गोचर करताना ग्रहांची युती आघाडी होत असते. त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. ऑक्टोबर महिन्यात तूळ राशीत बुद्धीचा दाता बुध ग्रह आणि ग्रहांचा सेनापती असलेल्या मंगळ ग्रहाची युती होत आहे. या युतीचा काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडतो. तीन राशींना या युतीचा लाभ मिळणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच करिअरमध्ये अचानक प्रगती दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही मार्गी लागतील.
तूळ : लग्न राशीतच मंगळ आणि बुध युती होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळेल. आत्मविश्वासात दुपटीने वाढ होईल. एखादा मोठा निर्णय घेण्यात पुढे याल. इतकंच काय तर घेतलेला निर्णय पथ्यावर पडू शकतो. समाजात मान सन्मान वाढेल. घरातील वाद विवाद शांत होतील. वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील. भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित वाढ होईल. काही करारातून चांगला फायदा होऊ शकतो.
धनु : या राशीच्या एकादश अर्थात उत्पन्न स्थानात ग्रहांची युती आहे. या काळात आर्थिक स्थिती झपाट्याने बदललेली दिसेल. काही अतृप्त इच्छा या काळात आर्थिक प्रगतीमुळे पूर्ण होतील. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. या काळात संपत्ती किंवा वाहन खरेदीचा योग आहे. धंद्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
कर्क : या राशीच्या सुख आणि प्रॉपर्टी स्थानात मंगळ आणि बुध युती करत आहे. या स्थानाप्रमाणे जातकाला फलं मिळेल. प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारातून चांगला फायदा होईल. रिअल इस्टेट, मेडिकल क्षेत्राशी निगडीत असतील त्याना लाभ मिळेल. इतकंच भौतिक सुख पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला जाईल. वाहन खरेदी करू शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. नातेवाईकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
