16 जुलैपासून या राशींचं टेन्शन वाढणार, 30 दिवसानंतर शनि-चंद्राच्या युतीमुळे विष योग
ग्रहमंडळात ठरावीक कालावधीनंतर अनेक घडामोडी घडत असतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. काही ग्रहांचं एकत्र येणं त्रासदायक ठरतं. अशीच एक युती शनि आणि चंद्राची होत आहे. यामुळे तीन राशींचं टेन्शन वाढणार आहे.

भारतात ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणारे अनेक जण आहे. त्यामुळे ग्रहांची स्थिती काय असेल? त्याचा आपल्या कामावर काय प्रभाव पडेल? याची चाचपणी करतात. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे बारीक लक्ष असतं. यासाठी ज्योतिषांचा सल्ला देखील घेतात. ग्रह मंडळात सर्वात मंद गतीने भ्रमण ग्रह म्हणजे शनिदेव.. एका राशीत अडीच वर्षे राहतात. तर सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह म्हणजे चंद्र.. एका राशीत अडीच दिवस ठाण मांडून गोचर करतो. त्यामुळे दर अडीच दिवसानंतर चंद्राची स्थिती बदलत असते. त्याचा राशीचक्रावर परिणाम होत असतो. 16 जुलैला चंद्र हा मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीत विष योग तयार होणार आहे. कारण शनि आणि चंद्राची युती ज्योतिषशास्त्रात अशुभ मानली जाते. त्यामुळे विषयोगाची स्थिती निर्माण होणार आहे. 18 जुलैपर्यंत हा योग असेल. त्यानंतर चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतील.
मीन : या राशीच्या जातकांना या विषयोगाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण या राशीतच हा योग तयार होणार आहे. या योगामुळे आत्मविश्वासात उणीव भासेल. दिलेलं कामंही पूर्णत्वास जाणार नाही. त्यामुळे डोक्यावर ताण राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत भांडण होऊ शकतं. तसेच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाकडून उसनवारी पैसे घेऊ नका. जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्या.
मेष : या राशीच्या 12 व्या स्थानात शनि आणि चंद्राची युती होत आहे. या स्थानाला मृत्यू आणि खर्चाचं स्थान म्हंटलं जातं. त्यामुळे खर्चावर या काळात नियंत्रण ठेवा. कारण तुमचं बजेट यामुळे बिघडू शकतं. भागीदारीच्या धंद्यात तुमची फसवणूक होऊ शकते. इतकंच काय काही तरी खोटा आळ तुमच्या लागू शकतो. लांबचा प्रवास करणं या काळात टाळा. कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
मकर : या राशीच्या जातकांच्या तिसऱ्या स्थानात शनि आणि चंद्राची युती होत आहे. त्यामुळे या काळात बहीण किंवा भावासोबत वाद होऊ शकतात. कामानिमित्त काही प्रवास घडतील पण त्यात कामं होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा वाया जाईल. या काळात तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा. काही वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिक्षण घेणाऱ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
