23 जुलैपासून या राशींचं नशिब पालटणारा योग, मंगळ ग्रहाची स्थिती ठरेल लाभदायी
ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती काही राशींसाठी फळ देणारी ठरते. त्यामुळे ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. अशीच काहीशी स्थिती 23 जुलैपासून होणार आहे. त्यामुळे राशींचं नशिब चमकणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एक ठरावीक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदलत असतात. ग्रहांच्या स्थिती बदलानंतर कुंडलीतील स्थानही बदलतात. त्यामुळे त्याचा प्रभाव राशीचक्रातील सर्वच राशींवर दिसून येतो. मंगळ ग्रह 23 जुलैला उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. काही दिवस मंगळ ग्रह या राशीत विराजमान होणार आहे. अशा स्थितीत मंगळाचं गोचर राशीचक्रावर प्रभाव टाकेल. समाजातील मानसन्मान, कलाक्षेत्र आणि दीर्घकालीन यश या काळात संभवते. काही राशींचं नशिब या काळात चमकेल. अचानक धनलाभ झाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. खासकरून तीन राशींना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत..
तूळ : या राशीच्या जातकांना मंगळ ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरू शकते. कारण मंगळ ग्रह या राशीच्या उत्पन्न स्थानात गोचर करत आहे. यामुळे या राशीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. या काळात नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन किंवा नवी संधी मिळू शकते. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थितीही सुधारेल. उद्योग धंद्यातही मनासारखी वाढ होईल. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते.
वृश्चिक : या राशीच्या जातकांनाही नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. कारण या राशीच्या दहाव्या स्थानात मंगळ विराजमान आहे. यामुळे उद्योग धंद्यात मनासारखी प्रगती दिसून येईल. प्रॉपर्टी, रियल इस्टेट आणि तंत्रज्ञानाशी निगडीत लोकांना लाभ होईल. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संधी चालून येतील. समाजात मानसन्मान वाढेल.
सिंह : या राशीच्या जातकांना मंगळ ग्रहाचं गोचर सकारात्मक परिणाम घडवणारं असेल. कारण या राशीच्या लग्न भावात म्हणजेच प्रथम स्थानात मंगळ आहे. यामुळे या काळात आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच तुमच्या शब्दाचा योग्य तो मान ठेवला जाईल. कामाच्या ठिकामी काही नवीन करार निश्चित होतील. यामुळे आर्थिक गणित सुटू शकते. संपत्ती किंवा वाहन खरेदीचा योग जुळून येईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
