
ज्योतिषशास्त्र मानणाऱ्यांचं लक्ष ग्रह नक्षत्रांकडे लागून असतं. प्रत्येक महिन्यात त्याचं गणित मांडून एक निष्कर्ष काढला जातो. मे महिना ज्योतिषीय दृष्टीने खूपच महत्त्वाच आहे. कारण या महिन्यात बरंच काही घडणार आहे. म्हणजेच ग्रहांच्या गोचरामुळे काही दुर्लभ योग तयार होणार आहेत. मे महिन्यात पाच मोठे ग्रह राशी बदल करणार आहे. राहु-केतु, गुरु, बुध आणि शुक्र हे ग्रह राशी बदल करणार आहत. यामुळे राशीचक्रावर त्याचा परिणाम होणार आहे. पण काही राशींसाठी हे गोचर लाभदायी ठरणार आहे. ग्रहांची स्थिती बदलताच तीन राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. जीवनात काही सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते…
मेष : या राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. मात्र इतर ग्रहांची स्थिती पाहता प्रगतीचे नवी दारं खुली होतील. काही अंशी शनिदेखील अनुकूल असणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती आणि पगार वाढीचा लाभ मिळू शकतो. तुमच्या कामावर वरिष्ठांचं लक्ष असेल आणि अपेक्षित रिझल्ट मिळाल्याने तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळेल. विदेशात जाण्याचं स्वप्न देखील या काळात पूर्ण होऊ शकतं.
कर्क : या राशीच्या जातकांना मे महिना ग्रहांच्या दृष्टीने अनुकूल जाणार आहे. ग्रहांची उत्तम साथ मिळेल. नशिबाची दारं खुली झाल्याचा भास होईल. कारण काही किचकट कामं चुटकीसरशी पूर्ण होतील. एखादं मोठं यश हाती लागू शकतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना अपेक्षित यश मिळेल. एकंदरीत पुढचा महिना चांगला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
सिंह : या राशीसाठी मे महिना चांगला जाणार आहे. कारण ग्रहांची स्थितीच तशी आहे. व्यवसायिकांना उद्योगधंद्यातून चांगला मोबदला मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना हवं त्या ठिकाणी पोस्टींग मिळू शकते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेली अडचण दूर होईल. वैयक्तिक आयुष्यात काही सुखसुविधा मिळतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात यश मिळेल.गेल्या काही दिवसांपासून त्रास देणारे तुमच्या पाठीपुढे करतील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)