Surya Gochar 2026: सूर्यदेव 3 ऑगस्टला करणार अश्लेषा नक्षत्रात प्रवेश, 3 राशींना मिळणार नशिबाची साथ
Surya Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळातील प्रत्येक घडामोडींचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची असते. आता सूर्यदेव 3 ऑगस्टला बुध ग्रहाचं स्वामित्व असलेल्या अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे राशीचक्रातील तीन राशींना लाभ मिळणार आहे.

Sun transit in Ashlesha Nakshatra: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्यामुळे एखादा ग्रहाने जागा बदलली तर त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. ग्रह ठरावीक कालावधीने राशी आणि नक्षत्र बदलत असतात. ग्रहांचा राजा असलेला सूर्यदेव आता नक्षत्र बदल करणार आहे. त्यामुळे त्याचा राशीचक्रावर परिणाम होणार हे सहाजिकच आहे. सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, नेतृत्व, वडील, सरकारी नोकरी आणि करिअरशी निगडीत असलेला ग्रह आहे. त्यामुळे सूर्याच्या नक्षत्र बदलामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव 3 ऑगस्ट 2026 रोजी अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हे नक्षत्र बुध ग्रहाचं मानलं जातं. त्यामुळे या नक्षत्रात प्रवेश करणार असल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतील. ज्योतिषशास्त्रानुसार, या स्थितीचा सकारात्मक प्रभाव वृषभ, कन्या आणि वृश्चिक राशीवर दिसू शकतो. चला जाणून घेऊयात या तीन राशींवर काय परिणाम होणार ते…
या तीन राशींवर सकारात्मक परिणाम दिसणार
वृषभ : या राशीच्या जातकांना सूर्याचा नक्षत्र बदल फायदेशीर ठरणार आहे. या राशीसाठी हा बदल सकारात्मक असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गस्थ लागतील. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना या स्थितीचा लाभ मिळेल. आपल्या मेहनतीचं योग्य ते फळ मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामांचं कौतुक होईल, तसेच वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पाठीवर पडू शकते. नोकरी बदलणाच्या विचार असणाऱ्यांसाठी हा काळ योग्य आहे. काही चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे.
कन्या : सूर्य ग्रहाने नक्षत्र बदल करताच कन्या राशीच्या जातकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून घाम गाळून आणि मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळालेलं नाही. आता त्या कामाची दखल घेतली जाईल. नोकरी आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसतील. कामाच्या ठिकाणी पगारवाढ होऊ शकते. इतकंच काय तर प्रमोशनही होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही सहज पूर्ण कराल.
वृश्चिक : सूर्याच्या नक्षत्र बदलामुळे या राशीलाही फायदा होणार आहे. गेल्या दिवसापासून नकारात्मक वातावरण हळूहळू निस्तरताना दिसेल. त्यामुळे सकारात्मक उर्जेने पुढची कामं करता येतील. गेल्या काही दिवसांपासून तु्म्ही ज्या गोष्टीची वाट पाहात होते, ती आता साध्य होताना दिसेल. नोकरीसाठी तुम्ही एखाद्या ठिकाणी अर्ज केला असेल तर तेथून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)