
दरवर्षी कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवोत्थान एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह केला जातो. तसेच तुळशी विवाहानंतरच आपण शुभ कामांना सुरूवात होते. तर आपल्या हिंदू धर्मात तुळशी विवाहाचे विशेष महत्त्व आहे आणि हा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि असे म्हटले जाते की लक्ष्मी माता तुळशीमध्ये वास करते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या वर्षी, तुळशी विवाह 2 नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांकडे यादिवशी भगवान विष्णूचे प्रतीक असलेल्या शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह केला जातो.
धार्मिक श्रद्धेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी काही खास उपाय केल्याने वैवाहिक जीवनात सुरू असलेला कलह दूर होतो. तसेच कोणत्याही तरूण-तरूणीचे लग्न जमत नसेल तर किंवा त्यात कोणत्याही अडथळा येत असेल तर ते तुळशीविवाहाच्या दिवशी हे खास उपाय करू शकतात.
तुळशी विवाहानिमित्त कोणते उपाय करावेत?
ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी विवाहाच्या दिवशी जर एखाद्या तरूणीला चांगला पती मिळावा यासाठी किंवा वैवाहिक जीवन आनंदी जगण्यासाठी काही उपाय केले तर त्यांना नक्कीच तिच्या इच्छेनुसार आशीर्वाद मिळतात. या शुभ प्रसंगी तुम्ही हे खास उपाय करू शकता:
विधी आणि पवित्रता लक्षात ठेवून तुळशीमातेची पूजा करा.
यानंतर तुळशीमातेला हळदीचे दूध अर्पण करा.
दूध अर्पण केल्यानंतर तुळशी मातेला श्रृंगार अर्पण करा.
पूजा झाल्यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा.
तुळशी विवाहाचे उपवास आणि पूजा केल्यानंतर सूर्य देवाची पूजा करा.
तुळशी विवाह पूजेनंतर काय करावे?
तुळशी विवाहाच्या दिवशी हे उपाय केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. या दिवशी खऱ्या मनाने तुळशी मातेची प्रार्थना करावी. शिवाय आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनापासून भक्ती आणि प्रार्थना करावी. शिवाय तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यानंतर, सूर्य देवाची पूजा करावी. असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि आनंदी वैवाहिक जीवन सुनिश्चित होते असे मानले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)