Astrology: आजचे राशी भविष्य, उत्पन्न वाढविण्यात या राशीचे लोकं होणार यशस्वी

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

|

Updated on: Sep 16, 2022 | 7:39 AM

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: आजचे राशी भविष्य, उत्पन्न वाढविण्यात या राशीचे लोकं होणार यशस्वी
जोतिषशास्त्र
Image Credit source: Social Media

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- तुम्हाला जीवनात प्रगतीसाठी नवीन मार्ग मिळतील. तुमच्या मनात आलेल्या नवीन कल्पनांचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एखाद्या वरिष्ठ सदस्याच्या सल्ल्याची आवश्यकता असू शकते. एखाद्या कठीण समस्येचं निराकरण करण्यास तुम्ही सक्षम असाल.
  2. वृषभ-  येणाऱ्या काही दिवसांत आजची मेहन खूप उपयुक्त ठरेल. पैसे मिळवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. जवळच्या मित्रांना तुमच्या मनातील गोष्टी सांगा यामुळे समस्या सुटेल. आपण कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढण्यास सक्षम असाल.
  3. हे सुद्धा वाचा

  4. मिथुन- आज तुम्ही जुन्या समस्यांमधून बाहेर पडाल. नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे, म्हणून वेळेचा योग्य वापर करा. नफ्यासाठी संधी मिळेल. तरुणांना नवीन नोकरी मिळू शकते. मित्र आणि जीवन साथीदाराच्या सहकार्याने मार्ग सोपा होईल.
  5. कर्क- तुमच्या कामाच्या क्षेत्रातील प्रयत्नांमुळे प्रगती होईल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी यश मिळू शकतं. तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. नोकरीमध्ये तुमची मेहनत कामी येईल.
  6. सिंह- कोणतंही काम करण्यासाठी घाई करू नका. प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.
  7. कन्या- आजचा दिवस तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असू शकतो. कमी प्रयत्नाने तुम्हाला अधिक नफा मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित मित्राच्या मदतीने तुम्ही प्रगती करू शकता. आज तुमचा बॉस तुम्हाला प्रोत्साहित करेल.
  8. तूळ- तुमचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा सकारात्मक व्यवहार लोकांना प्रभावित करण्यास मदत होईल. आपण पैसे मिळवण्यासाठी आणि आपली बचत वाढवण्यासाठी अधिक परिश्रम कराल आणि त्यामध्ये यशस्वी देखील होऊ शकता.
  9. वृश्चिक- तुम्ही खूप आनंदी रहाल. योग्य दिशेने कठोर परिश्रम करा. जेणेकरून अधिक काम केलं जाईल. कोणत्याही संपत्तीमध्ये पैसे गुंतवू शकता. घरात बांधकाम किंवा दुरुस्ती करायची असल्यास वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या.
  10. धनु- तुमचं मन आज उत्साही असेल. ज्येष्ठांचं मार्गदर्शन केल्यास नफ्यात वाढ होईल. बर्‍याच दिवसांपासून प्रयत्न करत असलेली प्रॉपर्टी मिळवण्यात यश मिळेल. शेजार्‍यांचं सहकार्य फायद्याचं ठरेल.
  11. मकर- मनामध्ये चांगल्या भावना येतील. कामाच्या संबंधात तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळतील. आयटी उद्योगाशी संबंधित लोकांसाठी हा चांगला काळ आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे.
  12. कुंभ- तुमची उत्साही वागणूक तुमच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करेल. पैसे मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. मार्केटींगशी संबंधित लोकांसाठी हा दिवस फायदेशीर ठरणार आहे.
  13. मीन- कला क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचं कौशल्य दर्शविण्याची उत्तम संधी मिळेल. पैसे कमवण्यासाठी छोटे मोठे प्रवास सुरु राहतील. व्यावसायिकांना गुंतवणूकीसाठी योग्य वेळ येईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI