AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांना होणार जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांचे जुने अडकलेले पैसे परत मिळतील.

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांना होणार जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 23, 2022 | 8:18 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  दिवस आनंदात जाईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीशी वाद घालू नका.
  2. वृषभ- आजचा दिवस चांगला जाणार आहे. मोठी गुंतवणूक शक्यतो टाळा. कुटुंबात आनंदाचे वातारण असेल.
  3. मिथुन- नोकरीतील बदल करणे टाळावे. नवीन परिचयाचा फायदा होईल. मोठे निर्णय पुढे ढकलावे . देवीला नारळ अर्पण करा.
  4. कर्क- नोकऱ्या बदलू नका. उधार दिलेले पैसे परत मिळतील. पांढर्‍या चंदनाचा तिलक लावावा.
  5. सिंह- मित्रांचं सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी जीवनावश्यक वस्तू जवळ ठेवा.  शिवलिंगावर साखर अर्पण करा.
  6. कन्या- अचानक प्रवास घडू शकतो. तुमच्या जोडीदाराचा आदर करा. वाणीवर नियंत्रण ठेवा
  7. तूळ- गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी राहील.
  8. वृश्चिक- परदेश प्रवासाचे बेत आखाल. नोकरीत वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. जुने अडकलेले पैसे मिळतील.
  9. धनु- आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुपाचं दान करावं.
  10. मकर- घरातील कलह संपुष्टात येणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या. गणपतीला लाल फुल वाहा.
  11.  कुंभ- रोजगाराचा प्रश्न संपणार आहे. जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबात मन रमेल. जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल.
  12. मीन- नात्यात गोडवा येणार आहे. प्रेम प्रकरणांसाठी चांगला काळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.