AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार परिश्रमाचे फळ

जोतिषशास्त्रानुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार आहे याबद्दल जाणून घेऊया. 'या' राशीच्या जातकांना त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळेल, त्यामुळे त्यांच्या जीवनात उत्साहाचे वातावरण असेल.

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांना मिळणार परिश्रमाचे फळ
राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 24, 2022 | 10:50 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य (Astrology)  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- नकारात्मक परिस्थितीनं डगमगून जाऊ नका. एखादा वाईट विचार मनात घर करु लागल्यास, त्यादृष्टीनं ध्यानधारणा करा. कपड्यांच्या व्यवसायात आज तुम्हाला फायदा होणार आहे.
  2. वृषभ- अथक परिश्रमांनंतरही तुम्हाला यश मिळत नसेल, तर आपण कुठे कमी पडतोय याचं आत्मपरीक्षण करा. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी परिस्थिती पूरक आहे. सतर्क राहा.
  3.  मिथुन-  मोठ्यांचा सल्ला तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. घरगुती खर्च वाढले तरीही आर्थिक पाठबळ असेल, त्यामुळं चणचण भासणार नाही.
  4. कर्क-  सकारात्मकतेनं दिवस परिपूर्ण असेल. अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. नव्या नात्यांना बहर येणार आहे. विश्वासार्ह मंडळींची मनं जिंकाल.
  5.  सिंह – तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळणार आहे. सावध राहा. जोडीदारासोबत असं एखादं काम कराल, ज्याचं कुटुंबीयांना कौतुक वाटेल.
  6. कन्या- खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवा. उत्साहाच्या भरात वायफळ खर्च नको. आरोग्याची काळजी घ्या. मसालेदार अन्नपदार्थ टाळा.
  7.  तुळ- घरात एखादं नवं उपकरण खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. बेजबाबदारपणा अंगावर येऊ शकतो, सावध राहा.
  8. वृश्चिक- नोकरीच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी आहे प्रचंड मेहनतीनं ते साध्य होणार आहे. एखादी अडचण येईल, पण ती वायुवेगाने निघूनही जाईल. देवाणघेवाणी करताना सतर्क राहा.
  9. धनु- ग्रह तुम्हाला चांगला परिणाम देणार आहेत. एखादी शुभसूचना मिळणार आहे. बेकायदेशीर कामांकडे तुमची वाट वळवू नका.
  10. मकर- आज तुम्हाला मोठ्या व्यक्तीच्या ओळखीचा फायदा होण्याची शक्यता आहे.  इतरांना आदर करणं शिका. आर्थिक परिस्थिती सुधारेल. गरीब कुटुंबाची मदत करा. आहाराच्या सवयी बदला.
  11. कुंभ- आज ज्यांचा वाढदिवस  आहे त्यांना भेटवस्तू मिळणार आहेत. वादांवर तोडगा निघेल. सर्वांमध्ये तुमच्या स्वभावाची चर्चा असेल, तोच स्वभाव तुम्हाला मोठं करणार आहे.
  12. मीन- व्यवसायात लाभ होणार आहे. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी सोडा. मित्रांना भेटण्याचा योग आहे. परिश्रमाचे फळ मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित