Astrology: शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत प्रभावी

शनी ही न्यायाची देवता आहे. शनीची साडेसाती सुरु असताना जातकाला कठीण काळातून जावे लागते. मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. यावर जोतोशाश्त्र काही उपाय सुचविण्यात आलेले आहे.

Astrology: शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी हे उपाय आहेत प्रभावी
शनिदेव
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 25, 2022 | 4:47 PM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) शनिदेवाला न्यायाची (God of Justice) देवता मानले जाते. शनी व्यक्तीला कर्मानुसार फळ देतो, म्हणून त्याला सर्व ग्रहांचा न्यायकर्ता देखील म्हणतात. यामुळे त्यांना जोतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे.  प्रत्येक माणसाच्या आयुष्यात शनीची साडेसाती (Shani Sadesati) येते. जर तुमच्या कुंडलीत शनि उच्चस्थानी असेल तर तो तुम्हाला अनपेक्षित लाभ देऊ शकतो. याशिवाय जर शनी निच्च स्थानी असेल समस्यांचा सामना अकरावा लागतो. जाणून घेऊया शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा प्रकोप कमी करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात.

या उपायांनी होतो फायदा

दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने साडेसातीचा त्रास कमी होतो. या उपायाने मानसिक तानवदेखील कमी होतो. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील. याशिवाय शनिवारी भगवान शिवाची पूजा केल्यानेदेशील शनिदेवाची कृपा राहते. कारण भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. त्यामुळे या दिवशी विधिनुसार भगवान शिवाची पूजा करण्यासोबतच शिव चालिसाचे पठण करावे.

दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तिळाचे तेल आणि आणि काळे तीळ अर्पण करावे. या उपायाने शनीचा प्रकोप कमी जातो व साडेसाती सुकर होते. शनिवारी लोखंडी वस्तू, तेल, चपला खरेदी करू नये. तसेच केस व नखं कापू नये.

शनिवारचा उपवास करा

ज्योतिष शास्त्रानुसार शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. साडेसातीतून जात असलेली व्यक्ती या दिवशी उपवास ठेवावा. उपवास ठेवणे शक्य नसल्यास किमान मांसाहार आणि मद्यपान करू नये.

ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. तो माणसाला चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देतो. कुंडलीत शनीची स्थिती योग्य असेल तर त्या व्यक्तीला राजाश्रय मिळतो असे म्हणतात. याउलट शनि शुभ नसेल तर कुंडलीत धैय्या, साडेसाती, शनीदोष, महादशा, अंतरदशा अशा समस्या येतात. या अवस्थेत व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत त्रास होतो. धनहानी आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)