AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार चांगली बातमी

तुमचा आजचा दिवस करा जाणार आहे? जाणून घ्या आजचे राशी भविष्य. या राशीच्या लोकांशी आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे .

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांना मिळणार चांगली बातमी
आजचे राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 25, 2022 | 8:03 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष: जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.  वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वडिलांचं मत समजून घ्या. या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने  काम मार्गी लावतील.
  2. वृषभ: आजचा दिवस चांगला असेल. मोठ्यांचा सन्मान करा. त्यांचा सल्ला घ्या. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. दिवस व्यस्त असला तरी आरोग्याची काळजी घ्या.
  3. मिथुन: आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका.
  4. कर्क: या राशीच्या लोकांसाठी रविवार अत्यंत खास असणार आहे. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल.
  5. सिंह: आपल्या वाणीत मधुरता आणा. अडकलेले पैसे मिळतील. नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. व्यावसायात फायदा होईल. कामाचं फळ चांगलं मिळेल. येत्या दिवसांत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
  6. कन्या: विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करावा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरातील महत्त्वाच्या कामात मदत करा. वायफळ खर्च करू नका. आरोग्याची काळजी घ्या.
  7. तुळ: कामात चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. नवे मित्र तर भेटतील मात्र काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आहे.
  8. वृश्चिक: आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तरुणांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत.
  9. धनु: सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
  10. मकर: पैसे कमवण्यासाठी दिवस चांगला आहे. करियरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच वाद निर्माण होऊ शकतात. नवीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
  11. कुंभ: जे लग्न करण्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना काही काळ आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. परिवारात ऐकी ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या.
  12. मीन: स्वतःवर विश्वास ठेवा.नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस अत्यंत चांगला आहे. अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. आरोग्यावर लक्ष द्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान