Baba Vanga Prediction : ती भविष्यवाणी खरी ठरली, आता चार राशींबद्दल बाबा वेंगांचं मोठं भाकीत, आयुष्यच बदलणार

बाबा वेंगा यांचं खरं नाव वेंगेलिया पांडेवा होतं, मात्र जगात त्यांना बाबा वेंगा नावानंच ओळखलं जातं. जेव्हा -जेव्हा जगभरातल्या भविष्यवेत्यांची चर्चा होते. त्यामध्ये सर्वात आधी बाबा वेंगा यांचं नाव घेतलं जातं.

Baba Vanga Prediction : ती भविष्यवाणी खरी ठरली, आता चार राशींबद्दल बाबा वेंगांचं मोठं भाकीत, आयुष्यच बदलणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2025 | 4:24 PM

बाबा वेंगा यांचं खरं नाव वेंगेलिया पांडेवा होतं, मात्र जगात त्यांना बाबा वेंगा नावानंच ओळखलं जातं. जेव्हा -जेव्हा जगभरातल्या भविष्यवेत्यांची चर्चा होते. त्यामध्ये सर्वात आधी बाबा वेंगा यांचं नाव घेतलं जातं. बाबा वेंगा यांचा जन्म बाल्कनमध्ये झाला. बाबा वेंगा यांच्याबद्दल बोलताना असा दावा केला जातो की, लहानपणी त्या एका वादळात सापडल्या होत्या, या वादळामुळे त्यांना आपली दृष्टी गमवावी लागली. मात्र त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. बाबा वेंगा यांचा मृत्यू 1996 मध्ये झाला. बाबा वेंगा यांनी आपल्या मृत्यूपूर्वी 5079 वर्षांपर्यंतची भविष्यवाणी करून ठेवली आहे.

त्यांची अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा केला जातो. त्यांनी हिटरलचा मृत्यू, अमेरिकेवर झालेला हल्ला, इंग्लंडच्या रानीचा मृत्यू अशी अनेक भाकीत वर्तवली होती, ती खरी ठरल्याचं बोललं जातं. बाबा वेंगा यांनी 2025 वर्षाबद्दल देखील मोठं भाकीत वर्तवलं आहे. 2025 साली जगाच्या अंताला सुरुवात होईल, 2025 मध्ये मोठे भूकंप होतील, महापूर येईल, भीषण युद्ध होईल ज्याचा सर्वाधिक फटका हा पश्चिमेकडील देशाला बसेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. दरम्यान थायलंडमध्ये झालेल्या भूकंपानंतर बाबा वेंगा यांचं भाकीत खर ठरल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान बाबा वेंगा यांनी चार राशींबद्दल देखील मोठं भाकीत वर्तवलं आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

मेष रास – बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार 2025 हे वर्ष मेष राशीसाठी करिअर आणि आयुष्यातील तुमची ध्येय यासंदर्भात स्पष्टता आणणारं असेल.या काळात मेष राशींच्या लोकांच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल.

वृषभ रास – वृषभ राशीसाठी 2025 हे वर्ष खूपच खास असणार आहे, या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात स्थिरता आणि समृद्धी येईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

मिथुन रास – मिथुन राशीसंदर्भात देखील बाबा वेंगा यांनी मोठं भाकती वर्तवलं आहे. 2025 हे वर्ष मिथुन राशींच्या लोकांना मान-सन्मान मिळून देणारं असेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत हाती येतील.

कुंभ रास – कुंभ राशीसाठी तर हे वर्ष खूपच शुभ आहे. कुंभ राशीच्या लोकांना या वर्षी काही आश्चर्यचकित फायदे होऊ शकतात. सर्व आर्थिक समस्या नष्ट होतील असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.