बाबा वेंगाला कुठून मिळाली होती दैवी शक्ती? तिचा मृत्यू झालाय का?

ज्याच्या भविष्यवाणी आजही खऱ्या ठरतात त्या बाब वेंगाबद्दल वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तिने केलेल्या भविष्यावाणी या खऱ्या ठरतात असंही म्हटलं जातं. पण कदाचितच हे कोणाला माहित असेल की त्यांना ही दैवी शक्ती नक्की मिळाली कशी आणि त्यांच्या भविष्यवाणीवर एवढा विश्वास का ठेवला जातो?

बाबा वेंगाला कुठून मिळाली होती दैवी शक्ती? तिचा मृत्यू झालाय का?
| Updated on: Mar 10, 2025 | 6:34 PM

1911 मध्ये वांगेलिया पांडेवा दिमित्रोवा म्हणून जन्मलेल्या बल्गेरियन गूढवादी आणि उपचार करणाऱ्या बाबा वेंगा यांचं नाव सर्वांनीच ऐकलं असेल. भविष्य सांगण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही भविष्यवाण्या अचूक ठरल्याचं म्हटलं गेलं आहे. वयाच्या 12 व्या वर्षी एका भयानक वादळामध्ये ती अडकली होती आणि त्या वादळात त्यांच्या डोळ्यात भरपूर माती गेल्यामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली. थोडे पैसे देऊन फक्त अर्धवट शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्याला पुन्हा पाहणे शक्य नव्हते. बाबा वेंगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी 5079 सालपर्यंतची भविष्यवाणी केल्याचं म्हटलं जात आहे.

बालपण कसं होतं?

बालपणी व्हेंजेलिया तपकिरी डोळे आणि सोनेरी केस असलेली एक सामान्य मूलगी होती. तिचे वडील मॅसेडोनियन क्रांतिकारी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते, ते पहिल्या महायुद्धात बल्गेरियन सैन्यात भरती झाले होते. युद्धामध्ये स्ट्रुमिका सर्ब, क्रोएट्स आणि स्लोव्हेन्स ही राज्ये यूगोस्लाविया या देशाने मिळवली. यानंतर युगोस्लाव्ह अधिकाऱ्यांनी तिच्या वडिलांना अटक केली आणि सोबतच त्यांची त्याची सर्व मालमत्ता जप्त केली, यामुळे तिच्या घरात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले. बाबा वेंगाची आई पण तिच्या लहानपणीचं मरण पावली होती. यामुळे वांगा तिच्या लहानपणी बराचसा काळ शेजारी आणि जवळच्या नातेवाईकांवर अवलंबून राहिली. काही वर्षांनी जेव्हा तिच्या वडिलांची सुटका झाली तेव्हा त्यांनी दूसरे लग्न केलं. वांगाने देखील एका बल्गेरियन सैनिक दिमितर गुश्तेरोव्ह याच्याशी लग्न केले होते.

अन् बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरू लागल्या 

पण जेव्हा यानंतर बाबा वेंगाचे डोळे गेले तेव्हा तिच्यासोबत आणखी एक अनोखी घटना घडली. यादरम्यान तिला थोडी दैवी शक्ती मिळाली. ज्यातून तिने स्वत:च्या हातांनी किरकोळ आजारांवर उपचार करणे सुरू केले. तसेच ती अनेक भाकितही करायची, जी बऱ्याचदा खरी ठरायची. दरम्यान, एक सैनिक त्याच्या भावाच्या मारेकरी शोधण्यासाठी तिच्याकडे आला होता. बाबा वेंगानी बल्गेरियन सैनिक दिमितार गुश्तरोव्हला सत्य सांगितले. पण त्याचवेळी, सैनिकाने खुन्याचा बदला न घेता त्याला सोडून द्यावे, असे वचन तिने घेतले. काही काळानंतर हा सैनिक तिचा जीवनसाथी बनला. परंतु1947 मध्ये त्याला एक आजाराने ग्रासले होते, यादरम्यान तो दारूच्या आहारी गेला आणि अखेरीस 1 एप्रिल 1962 रोजी त्यांचे निधन झाले. बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरू लागल्या. दुसर्‍या महायुद्धाचा काळ होता. लोक त्यांच्याकडे जीवन आणि मृत्यूचा अंदाज घेण्यासाठी येत असत आणि त्या सत्य सांगत असत. बाबा वेंगाचे 1996 स्तनाच्या कर्करोगाने निधन झालं.

दैवी शक्तींनी दिलेली देणगी 

पण बाबा वेंगाचा असा विश्वास होता की तिची क्षमता ही दैवी शक्तींनी दिलेली देणगी आहे आणि तिने अत्यंत गंभीरतेने उचललेली ती जबाबदारी आहे. तिने कथितपणे अदृश्य घटकांशी संवाद साधला ज्यांनी तिला माहिती दिली. विशेष म्हणजे, तिने तिच्या या शक्तीचा कधीही आर्थिक फायद्यासाठी उपयोग केला नाही, असे म्हटले जाते. तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून गांधींच्या मृत्यूपर्यंत, तर 11 सप्टेंबरच्या हल्ल्यापासून ते ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्यापर्यंत अनेक भविष्यवाणीबाबा वेंगाने केल्या असल्याचं सांगितलं जातं.

खऱ्या ठरलेल्या भविष्यवाणी

बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विभाजन, अमेरिकेवरील 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेंस डायनाचा मृत्यू, चेर्नोबिल दुर्घटना, अमेरिकेला मिळालेले पहिले आफ्रिकन राष्ट्राध्यक्ष, यांसह अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, ज्या खऱ्या ठरल्या होत्या. वेंगा यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन यांच्याबाबतही भविष्यवाणी केली होती. ट्रम्पना गूढ आजार होईल तर पुतीन यांच्यावर त्यांच्याच देशातील काही समाजकंटक हल्ला करतील, असंही सांगितलं होतं.