
सध्या जगामध्ये अशा अनेक घडामोडी घडत आहेत, ज्यामुळे आपला भविष्य काळ कसा असेल याबाबत अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. अनेकांना आपलं भविष्य जाणून घेण्याची इच्छा आहे. 2025 मध्ये अशा काही घटना घडल्या आहेत, ज्या घटनांबाबत बल्गेरीयाच्या जगप्रसिद्ध भविषवेत्त्या बाबा वेंगा यांनी आधीच भाकीत करून ठेवंलं होतं,असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान 2025 मध्ये घडणाऱ्या आणखी काही घटनांबाबत बाबा वेंगा यांचं भाकीत आता समोर आलं आहे. या भविष्यवाणीमुळे जगाची चिंता वाढली आहे.
कोण होत्या बाबा वेंगा?
बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म 1911 साली बल्गेरियामध्ये झाला, तर मृत्यू 1996 मध्ये झाला. त्यांनी आपल्या हयातीमध्ये भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांचं भाकीत वर्तवलं होतं, ज्या भविष्यात खऱ्या ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. दरम्यान त्यांच्याबाबत असा देखील दावा करण्यात येतो की, लहाणपणी एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती, मात्र त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यांनी अनेक भाकीतं वर्तवली. ज्यामध्ये हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, जपानमध्ये आलेली त्सुनामी, अमेरिकेवर झालेला हल्ला अशा अनेक भाकीतांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान आता बाबा वेंगा यांचं आणखी एक भाकीत समोर आलं आहे, 7 जून 2025 नंतर जगात मोठी उलथापालथ होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार देखील 7 जून 2025 ही तारीख खास आहे. कारण या तारखेला मंगळ ग्रहानं सिंह राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहस्थितीचा मोठा परिणाम हा राजकीय स्थिती आणि अर्थकरणावर होऊ शकतो.
काय आहे बाबा वेंगा यांचं भाकीत
बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे की, 2025 नंतर जग दोन भागांमध्ये विभागलं जाईल, एक भाग हा अध्यात्मामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करेल तर दुसरा भगा हा तांत्रिक दृष्या प्रगत असेल. दक्षिण गोलार्धामध्ये मोठा विस्फोट होईल, तसेच पाण्यामध्ये विष मिसळल्यामुळे एक नवा आजार उद्भवेल असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.