Chandal yog: आयुष्यात सतत करीत असाल समस्यांचा सामना तर कुंडलीत असू शकतो चांडाल योग

| Updated on: Jun 17, 2022 | 9:46 AM

बृहस्पति आणि राहु एका राशीत किंवा घरामध्ये एकत्र असतात किंवा कुंडलीत एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असतात तेव्हा कुंडलीत चांडाल योग (Chandal yog) तयार होतो. या दोघांच्या संयोगाने गुरु चांडाल योग किंवा चांडाल दोष (chandal dosh) निर्माण होतो, जी कुंडलीत फार मोठी विसंगती मानली जाते. या योगामुळे जीवनात विविध प्रकारच्या सुखसोयींमध्ये आणि जीवनात पुढे जाण्यासाठी अडचणींचा सामना […]

Chandal yog: आयुष्यात सतत करीत असाल समस्यांचा सामना तर कुंडलीत असू शकतो चांडाल योग
Follow us on

बृहस्पति आणि राहु एका राशीत किंवा घरामध्ये एकत्र असतात किंवा कुंडलीत एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असतात तेव्हा कुंडलीत चांडाल योग (Chandal yog) तयार होतो. या दोघांच्या संयोगाने गुरु चांडाल योग किंवा चांडाल दोष (chandal dosh) निर्माण होतो, जी कुंडलीत फार मोठी विसंगती मानली जाते. या योगामुळे जीवनात विविध प्रकारच्या सुखसोयींमध्ये आणि जीवनात पुढे जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. या योगाने प्रभावित व्यक्ती खूप भौतिकवादी असते, आणि ती आपल्या जीवनात नकारात्मकतेकडे वाटचाल करतो. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. याशिवाय ज्याला  पैसे कमवण्याची तीव्र इच्छा आहे, तो योग्य आणि अयोग्य मार्गातील फरक ओळखू शकत नाही. अशा स्थितीत ती व्यक्ती चारित्र्य ऱ्हासाची बळी ठरते आणि काही विशिष्ट परिस्थितीत ती हिंसक आणि मूलतत्त्ववादीही बनू शकते.

उपाय-

 

चांडाल योग शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गुरु चांडाल दोष निवारण पूजा. खरं तर, ही अशी पूजा आहे, ज्यामुळे गुरु चांडाल योगाचा प्रभाव खूप कमी होतो, म्हणून तुम्ही योग्य ब्राह्मणाकडून गुरु चांडाल योग शांती पूजा करून घेऊ शकता.
तुमच्या कुंडलीत बृहस्पतिचे स्थान शुभ असेल तर तुम्ही ब्राह्मणांना दान द्यावे आणि गुरू तुल्य  लोकांना मान द्यावा. अशा लोकांनी गुरुवारी केळीचे झाड लावून त्याची पूजा करावी. जर तुमच्या कुंडलीत चांडाल योग तयार होत असेल तर तुम्ही गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना पिवळे चंदन अर्पण करावे.

हे सुद्धा वाचा
  1. राहू ग्रह शांत करून राहूच्या बीज मंत्रांचा जप करावा.
  2. नाभी, मान, डोके, कान आणि जिभेवर दररोज केशर लावावे.
  3. गुरुवारी विद्यार्थ्यांनी शिक्षणाशी संबंधित साहित्य दान करावे.
  4. जर तुमच्या कुंडलीत हा चांडाल योग फारच अशुभ प्रभाव देत असेल तर तुम्ही जीवनातील कोणतेही काम घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेऊनच करा.
  5. गौ मातेची नियमित सेवा करा आणि तिला गहू आणि हिरवे गवत खायला द्या.
  6. वटवृक्षाच्या मुळास कच्चे दूध अर्पण करावे.
  7. भगवान श्री गणेश आणि माता सरस्वती यांची नियमित पूजा केल्याने चांडाल योगाच्या दुष्परिणामांपासूनही तुमचे रक्षण होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)