Astrology kemadrum dosh: कुठल्याच प्रयत्नांना यश येत नसेल तर कुंडलीत असू शकतो केमद्रुम दोष; ‘या’ उपायांनी दोष होईल दूर

कुंडलीत असे काही योग तयार होतात ज्यात आयुष्य बदलण्याची ताकद असते. यापैकी काही योगांना राजयोग म्हणतात, जे जीवनात यश देतात, तर काही योग जीवनात अपयश आणि समस्यांना जन्म देतात. त्यांना अशुभ योग किंवा दोष (kemadrum dosh) म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे अनेक प्रकारचे संयोग सांगितले आहेत, ज्यांचा माणसाच्या जीवनावर थेट परिणाम होतो. काही […]

Astrology kemadrum dosh: कुठल्याच प्रयत्नांना यश येत नसेल तर कुंडलीत असू शकतो केमद्रुम दोष; 'या' उपायांनी दोष होईल दूर
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 4:17 PM

कुंडलीत असे काही योग तयार होतात ज्यात आयुष्य बदलण्याची ताकद असते. यापैकी काही योगांना राजयोग म्हणतात, जे जीवनात यश देतात, तर काही योग जीवनात अपयश आणि समस्यांना जन्म देतात. त्यांना अशुभ योग किंवा दोष (kemadrum dosh) म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे अनेक प्रकारचे संयोग सांगितले आहेत, ज्यांचा माणसाच्या जीवनावर थेट परिणाम होतो. काही शुभ योग आपल्या परिचयाचे आहेत पण याशिवाय काही अशुभ योगसुद्धा आहेत ज्याची गणना अशुभ योग किंवा दोष म्हणून केली जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास ग्रहयोगांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची गणना ज्योतिषशास्त्रात अशुभ योगांमध्ये केली जाते आणि एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत त्यांची उपस्थिती त्याच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करते.

केमद्रुम दोष (kemadrum dosh)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या विशेष स्थितीमुळे केमद्रुम दोष निर्माण होतो. ज्या घरामध्ये किंवा राशीमध्ये चंद्र आहे त्या घरातून दुसऱ्या आणि बाराव्या घरात सूर्याशिवाय दुसरा कोणताही ग्रह नसेल, म्हणजेच राशीपासून दुसऱ्या आणि बाराव्या (दोन्ही) घरात कोणताही ग्रह नसेल तर केमद्रुम दोष निर्माण होतो. राहु किंवा केतू यापैकी कोणतेही ग्रह या घरांमध्ये असतील तर त्यांची उपस्थिती देखील केमद्रुम दोष मानला जातो. वराहमिहिराने आपल्या मुख्य ग्रंथ बृहद्जातकमध्ये केमद्रुम दोषाबद्दल बरेच काही सांगितले आहे आणि मंत्रेश्वर महाराजांनी देखील केमद्रुम दोषाबद्दल बरेच काही सांगितले आहे. त्यांच्या मते, या योगाचा परिणाम असा आहे की, माणूस आयुष्यात दुःखी, गरीब होतो आणि इतरांच्या हाताखाली काम करतो. शास्त्रात सांगितले आहे की, जर एखाद्याच्या कुंडलीत केमद्रुम दोष असेल तर तो राजाच्या घरी जन्माला आला तरी त्याच्या आयुष्यात अडचणी आणि समस्या येत राहतात. अशी व्यक्ती संघर्षांना तोंड देतच मोठी होते.

केमुद्रम दोष असल्यास हे करा

  1. चंद्र भगवान शिवाशी संबंधित आहे, म्हणून भगवान शंकराची पूजा करा आणि त्यांना दररोज पाण्याने किंवा गाईच्या दुधाने अभिषेक करणे हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो.
  2. शिव सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करणे आणि रुद्राभिषेक करणे. याशिवाय  महामृत्युंजय मंत्राचा जप करणे देखील केमद्रुम योगाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. केमुद्रम योगाच्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवावे आणि जर ही पौर्णिमा सोमवारपासून सुरू झाली तर खूप शुभ आहे. अशा व्यक्ती, ज्यांच्या कुंडलीत केमुद्रम योग तयार होत आहे, त्यांनी श्री यंत्राची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी आणि श्री सूक्ताचे नियमित पठण करावे.
  5. दुसरा उपाय म्हणजे घरामध्ये दक्षिणावर्ती शंख लावल्यानंतर ते नियमित पाण्याने भरून त्या पाण्याने माता महालक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करावा  आणि नंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.