AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar: ते आधी बंद करा मग तुम्ही जिंकाल…गावस्कर यांनी भारतीय संघाला झाप झाप झापलं

Sunil Gavaskar News: भारतीय क्रिकेट संघाची मागील काही महिन्यातील कामगिरी इतकी चांगली पाहायला मिळालेली नाही. टी-20 मालिकेतील भारतीय संघाची कामगिरी चांगली दिसली नाही. आता या मालिकेपूर्वी भारतीय संघाबद्दल माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी संघाला आता खूप झापले आहे. 

Sunil Gavaskar: ते आधी बंद करा मग तुम्ही जिंकाल...गावस्कर यांनी भारतीय संघाला झाप झाप झापलं
| Updated on: Aug 13, 2026 | 10:05 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाची मागील काही महिन्यातील कामगिरी इतकी चांगली पाहायला मिळालेली नाही. टी-20 मालिकेतील भारतीय संघाची कामगिरी चांगली दिसली नाही. यामुळे अनेक दिग्गजांनी भारतीय संघावर मोठी टीका केली. आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. आता या मालिकेसाठी भारतीय संघाचा जोरदार सराव सुरु आहे. आता या मालिकेपूर्वी भारतीय संघाबद्दल माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी संघाला आता खूप झापले आहे.

सुनील गावस्कर म्हणाले की, “भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूने स्वत:च्या प्रतिमेचा विचार न करता सांघिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे.” असे मत मांडणारे गावस्कर हे एकमेव नाहीत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही ठसुपरस्टार संस्कृती आवडत नाही आणि केवळ एक-दोन खेळाडूंऐवजी संपूर्ण भारतीय संघाला ओळख मिळावी, ” अशी त्यांची इच्छा आहे.

गावस्कर यांची ही टिप्पणी गॉल येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी आली आहे. पुढील वर्षी ओव्हल येथे होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतासमोर मोठे आव्हान आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर, अंतिम फेरीत पोहोचण्याची कोणतीही संधी मिळवण्यासाठी भारताला आपल्या उर्वरित नऊ कसोटी सामन्यांपैकी सात सामने जिंकावे लागतील.

गावस्कर म्हणाले, “भारत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप करू शकतो आणि हे सर्वस्वी संघाला आवश्यक आत्मविश्वासावर अवलंबून आहे. मात्र, त्यांनी पुढे असेही म्हटले की, “काही ठराविक मोठ्या खेळाडूंना नाही तर संपूर्ण  भारतीय क्रिकेटला प्राधान्य मिळायला हवं. श्रीलंकेतील दोन सामन्यांची मालिका सोपी नसेल, कारण श्रीलंका हा घरच्या मैदानावर एक मजबूत संघ आहे. हे दोन कसोटी सामने जिंकणे ही नवीन कसोटी हंगामाची एक चांगली सुरुवात असेल आणि संघाला विश्वचषक अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता आवश्यक चालनाही देईल,” असे गावस्कर यांनी स्पोर्टस्टारमधील आपल्या स्तंभात लिहिले.

ते पुढे म्हणाले, “असे करण्यासाठी खूप मेहनत आणि थोडे नशीब लागते, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय क्रिकेटला प्राधान्य दिले पाहिजे, कोणत्याही व्यक्तीला नाही, मग तिचे नाव कितीही मोठे असो, असा विश्वास असायला हवा.” श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी, भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळला आणि सहा गडी राखून विजय मिळवला. देवदत्त पडिक्कलने पहिल्या डावात नाबाद शतक झळकावून शानदार कामगिरी केली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?