Diwali 2022: दिवाळीच्या आधी या राशींच्या लोकांवर कृपा बरसविणार माता लक्ष्मी, आर्थिक स्थिती सुधारणार

यंदाच्या दिवाळीत काही राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळण्याची शक्यता आहे.

Diwali 2022: दिवाळीच्या आधी या राशींच्या लोकांवर कृपा बरसविणार माता लक्ष्मी, आर्थिक स्थिती सुधारणार
दिवाळी २०२२
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 19, 2022 | 6:31 PM

मुंबई,  ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. हे चक्र पूर्ण करण्यासाठी शनिदेवाला (Shanidev)  अडीच वर्षे लागतात.  शनीची ही चाल सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येते. यावेळी 23 ऑक्टोबरला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी शनिदेव राशी परवर्तन करणार आहेत.  कोणत्याही ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा सगळ्याच राशींवर परिणाम पडतो. मात्र आता शनी धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2022) दिवशी मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशी परिवर्तनाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. यंदाच्या दिवाळीत (Diwali 2022) माता लक्ष्मीची या राशींवर विशेष कृपा असणार आहे.

  1. मेष- ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीत शनीचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ देणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरदार लोकांसाठी हा काळ प्रगतीचा आणि लाभाचा ठरणार आहे. व्यवसायातही चांगला फायदा होईल.
  2. तूळ- तूळ राशीच्या लोकांसाठी शनिमार्गी खूप फलदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना पुढील अडीच वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत फलदायी असणार आहे. जुन्या वादातून सुटका होऊ शकते. कौटुंबिक सर्व प्रश्न सुटतील. अडकलेले पैसे मिळतील.  संकटकाळ संपणार आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी करिअरचे नवीन मार्ग खुले होतील.
  3. धनु- शनीच्या थेट चालीमुळे धनु राशीच्या लोकांचे दिवस बदलणार आहेत. या काळात, या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. जुन्या कर्जातून सुटका होऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला सन्मान मिळेल. प्रेमविवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)