
मुंबई : यंदा 10 नोव्हेंबरपासून दिवाळीला (Diwali 2023) सुरूवात होणार आहे. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सर्वत्र दिवे लावले जातात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीचे घरी आगमन होते असे मानले जाते. अशा वेळी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काही शुभ गोष्टी आणल्या तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. दिवाळीत प्रत्येक घरात दिवे लावले जातात. या दिवशी घराच्या प्रत्येक भागात प्रकाश असावा असे म्हणतात. याशिवाय घराची सजावटही चांगली असावी. लक्ष्मीच्या आगमनाची पूर्ण तयारी करावी. दिवाळीच्या आधी काही वस्तू घरी घेऊन आल्यास आर्थिक आवक वाढते.
हिंदू धर्मात धातूचे कासव शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत दिवाळीच्या मुहूर्तावर धातूचे कासव घरी आणल्यास घरात सुख-समृद्धी येते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोने, चांदी किंवा पितळी कासवही घरी आणू शकता. यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
दिवाळीत लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर देव यांची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर लक्ष्मी आणि कुबेरजींच्या मूर्ती घरी आणणे शुभ मानले जाते. अशा प्रकारे व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होते.
मातीची भांडी फक्त आरोग्यासाठी चांगली नसून ती शुभ मानली जातात. अशा स्थितीत दिवाळीच्या दिवशी मातीचे भांडे घरी आणा आणि त्यात पाणी भरून घराच्या उत्तर दिशेला ठेवा. यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
घराचा मुख्य दरवाजा जिथून लक्ष्मी आणि सौभाग्य घरात प्रवेश करतात. त्यामुळे ते सुंदर, स्वच्छ असणे आणि त्यावर स्वस्तिक, शुभ-लाभ किंवा गणेशजी इत्यादी कोणतेही शुभ चिन्ह असणे अत्यंत हितकारक मानले जाते. सणासुदीच्या दिवसात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंबा, अशोक किंवा फुलांची ताजी हिरवी पाने बांधणे शुभ आणि समृद्ध मानले जाते.
वास्तूनुसार, ईशान कोपरा (उत्तर-पूर्व) हे पाणी आणि देवाचे स्थान मानले जाते आणि येथे सर्वात सकारात्मक ऊर्जा वास करते. ही दिशा स्वच्छ ठेवून येथे पाण्याचे भांडे ठेवल्याने सौभाग्य वाढते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. दिवाळीच्या सजावटीसाठी तुम्ही मातीची वाटी पाण्याने भरून त्यात फुलांच्या पाकळ्याही ठेवू शकता.
दिवाळी निमित्त रांगोळी शुभाचे प्रतीक म्हणून काढल्या जातात.लक्ष्मीच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढल्या जाते. लक्षात ठेवा रांगोळीमध्ये काळा रंग असता कामा नये.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)