AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2023 : दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीज कधी होणार साजरे? अशी आहे संपूर्ण यादी

Diwali 2023 पौराणिक कथेनुसार नरकासुर नावाच्या राक्षसाचा भगवान श्रीकृष्णाने वध केला होता. त्यानंतर ते बहिण सुभद्राच्या घरी गेला. सुभद्राने त्यांचे स्वागत केले. त्याला टिळक लावले. मिठाई दिली. पुष्पहार अर्पण करून त्यांचे दीर्घायुष्य व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो.

Diwali 2023 : दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीज कधी होणार साजरे? अशी आहे संपूर्ण यादी
दिपोत्सवImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 11, 2023 | 7:10 PM
Share

मुंबई : पितृपक्ष संपताच एकामागून एक अनेक मोठे सण येणार आहेत. आधी सत्याचा असत्यावर विजयाचे प्रतिक असलेला दसरा आणि नंतर  धनत्रयोदशी, हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा असलेला सण दिवाळी (Diwali 2023) आणि भाऊबीज हे सण येतील. अशा परिस्थितीत या सणांच्या तारखा आणि दिवस जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्सुकता असते. जेणेकरून ते सणाच्या तारखा डोळ्यासमोर ठेवून पुढील तयारी सुरू करू शकतील. आज आपण या सणांच्या तारखा जाणून घेऊया.

या तारखांना साजरे होणार सण

दसरा

विजय दशमी म्हणजेच दसरा हा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला साजरा केला जातो. यंदा विजय दशमीचा सण मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे.

धनत्रयोदशी

धनतेरस हा ऐश्वर्य, सुख, आरोग्य आणि समृद्धीचा सण आहे. कार्तिक महिन्यातील त्रयोदशीला हा उत्सव साजरा केला जाईल. कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.35 ते 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.57 पर्यंत असेल. अशा स्थितीत धनत्रयोदशीचा सण शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. तसे, धनत्रयोदशी सणाची शुभ मुहूर्त संध्याकाळ आहे. संधिप्रकाशात पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. धनत्रयोदशीच्या दिवशी, आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते, ज्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य मिळण्यास मदत होते.

दिवाळी कधी आहे?

कार्तिक अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यावर्षी कार्तिक अमावस्या 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 02.45 ते 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 02.56 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत रविवार, 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीत महालक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते. त्यांच्या उपासनेने आपल्या जीवनात सुख-समृद्धी येते. प्रदोष काळात दिवाळीची पूजा करण्याचा उत्तम काळ असतो. या शुभ मुहूर्तावर उपासना केल्याने इच्छित फळ मिळते.

दिवाळीत पूजेची वेळ

दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त रविवार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.39 ते रात्री 8.16 पर्यंत असेल.

हिंदू सणांमध्ये भाऊ बिजेला विशेष दर्जा देण्यात आला आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या ओवाळतात आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याची आणि दीर्घायुष्याची कामना करतात. यंदा मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी भाऊ बीज साजरी होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.33 ते 03.22 पर्यंत शुभ मुहूर्त असेल.

सणाच्या तारखा

धनत्रयोदशी- शुक्रवार, 10 नोव्हेंबर छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशी – शनिवार, 11 नोव्हेंबर दिवाळी (लक्ष्मी पूजन) – रविवार, 12 नोव्हेंबर गोवर्धन पूजा आणि भैदूज – मंगळवार, 14 नोव्हेंबर

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान