Gemini/Cancer Rashifal Today 29 June 2021 | नकारात्मक विचारांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो

मंगळवार 29 जून 2021 (Gemini/Cancer Rashifal). मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल.

Gemini/Cancer Rashifal Today 29 June 2021 | नकारात्मक विचारांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो
mithun-karka
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 11:35 PM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 29 जून 2021 (Gemini/Cancer Rashifal). मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या मंगळवारचं संपूर्ण राशीभविष्य (Gemini/Cancer Daily Horoscope Of 29 June 2021 Mithun And Karka Rashifal Today) –

मिथुन राश‍ी (Gemini), 29 जून

आपण आपल्या कार्यासाठी जितकी मेहनत कराल तितके आपल्याला योग्य परिणाम मिळेल. तरुणांना त्यांचं कन्फ्युजन दूर झाल्याने दिलासा मिळेल आणि त्यांना भविष्या संबंधित प्रश्न सोडवण्यासाठीही धैर्य मिळेल.

एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल तुमच्या मनात शंका आणि संभ्रमासारखी परिस्थिती उद्भवू शकते. ज्याचा परस्पर संबंधांवर परिणाम होईल. यावेळी सकारात्मक विचार करा. भांडवलाच्या गुंतवणूकीपूर्वी सर्व बाबींचा विचार करा.

व्यवसायिक विस्तार संबंधी योजना होऊ शकते. त्याकडे पूर्ण एकाग्रतेने लक्ष द्या. कारण, भविष्यात ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि आर्थिक स्थिती देखील चांगली होईल.

लव्ह फोकस – कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य सामंजस्य आणि ताळमेळ असेल. प्रेमसंबंधांमध्येही निकटता वाढेल.

खबरदारी – नकारात्मक विचारांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि आपल्या शारीरिक क्षमतेत घट देखील जाणवेल.

लकी रंग – नारंगी
लकी अक्षर- ला
फ्रेंडली नंबर- 5

कर्क राश‍ी ( Cancer), 29 जून

तुमचा धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यावरील विश्वास वाढेल आणि आपल्या वागण्यातही एक सकारात्मक बदल होईल. आपला संपूर्ण दिवस एखाद्या विशिष्ट योजनेच्या अंमलबजावणीत व्यतीत होईल. दिवस शांततेत जाईल.

घरातील वडीलधाऱ्यांचा आदर आणि सन्मान यात काही कमी करु नका. त्यांच्या नाराजीचा परिणाम घराच्या वातावरणावरही होईल. जोखीमेच्या कामांपासून दूर रहा. मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्यामध्ये नकारात्मक विचार वाढू देऊ नका.

व्यवसायात होत असलेल्या बदलांवर आपले लक्ष केंद्रित करा. या योजना आपल्याला भविष्यात प्रगती देतील. मार्केटिंग संबंधित कामात वेळ घालवू नका कारण आता कोणताही फायदा होणार नाही.

लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण सुव्यवस्थित आणि आनंददायी राहील. मुले देखील शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक असतील.

खबरदारी – शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. म्हणून स्वत:साठी आणि मनोरंजनासाठी थोडा वेळ काढा.

लकी रंग – गुलाबी
लकी अक्षर- स
फ्रेंडली नंबर- 9

Gemini/Cancer Daily Horoscope Of 29 June 2021 Mithun And Karka Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Sagittarius/Capricorn Rashifal Today 21 June 2021 | अनावश्यक खर्च जास्त होईल, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा राहील

Libra/Scorpio Rashifal Today 21 June 2021 | वैवाहिक संबंध गोड ठेवण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील