31 ऑक्टोबरपासून गुरु-शनीचा षडाष्टक योग; 3 राशींच्या वाढणार अडचणी, राहा सावध!

Guru Shani Shadashtak Yog: 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरु ग्रहाच्या सिंह राशीतील गोचरामुळे शनी आणि गुरु यांच्यामध्ये षडाष्टक योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगाचा तीन राशींवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून आर्थिक व्यवहार, करिअर आणि कौटुंबिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

31 ऑक्टोबरपासून गुरु-शनीचा षडाष्टक योग; 3 राशींच्या वाढणार अडचणी, राहा सावध!
| Edited By: | Updated on: Oct 30, 2026 | 9:49 PM

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या गोचरला विशेष महत्त्व दिले जाते. ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे वेगवेगळे योग निर्माण होतात आणि त्यांचा परिणाम सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात होत असल्याचे मानले जाते. 31 ऑक्टोबर 2026 रोजी देवगुरु बृहस्पती अतिचारी गतीने सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे शनी आणि गुरु यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या भावात असतात, तेव्हा या योगाची निर्मिती होते. या काळात शनी गुरुच्या आठव्या भावात, तर गुरु शनीच्या सहाव्या भावात असतील. हा योग आव्हानात्मक मानला जात असून त्याचा परिणाम आर्थिक स्थिती, करिअर, आरोग्य आणि नातेसंबंधांवर होऊ शकतो. विशेषतः तीन राशींच्या व्यक्तींनी या काळात अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

कन्या

Loading...

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी गुरु बाराव्या भावात, तर शनी सातव्या भावात असणार आहे. त्यामुळे या काळात आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी विचार करा. दिलेले पैसे परत मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे टाळावे.

उपाय : भगवान विष्णूची पूजा करावी आणि त्यांचे स्मरण करावे.

मकर

मकर राशीचा स्वामी शनी आहे. गुरु आणि शनीच्या षडाष्टक योगामुळे या राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक तसेच आर्थिक बाबतीत चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या एखाद्या बोलण्यामुळे कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या व्यक्ती दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. चुकीच्या संगतीपासून दूर राहा. बाहेरचे अन्नपदार्थ खातानाही काळजी घ्या.
उपाय : भगवान शंकराची आराधना करावी आणि शिवमंत्रांचा जप करावा.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना या योगामुळे आर्थिक बाबतीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असून त्यामुळे आर्थिक बजेट बिघडू शकते. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे. परदेशाशी संबंधित कामांमध्ये कागदपत्रांकडे दुर्लक्ष करू नका. तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या.

उपाय : केळी, पिवळी डाळ आणि पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचे दान करणे शुभ मानले जाते.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us