
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार राहु केत आणि शनि हे पापग्रह आहेत. या ग्रहांचा गोचर कालावधी एकदम धीमा आहे. एका राशीत दीर्घकाळ ठाण मांडून बसतात. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. ऑक्टोबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. कारण तीन पापग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. हा बदल चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी दिसून येणार आहे. चंद्रग्रहण 29 ऑक्टोबरला आहे आणि 30 ऑक्टोबरला राहु केतु राशी बदल करणार आहेत. वक्री गोचर करणारे राहु आणि केतु ग्रह आपली रास बदलणार आहे. केतु ग्रह तूळ राशीतून कन्या राशीत, तर राहु ग्रह मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर चार दिवसानंतर शनि मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार आहे.
कर्क : तीन ग्रहांची उलथापालथ या राशीच्या पथ्यावर पडणार आहे. काही कामं झटपट मार्गी लागतील. अचानक होणाऱ्या बदलामुळे तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. भागीदारीच्या धंद्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जर भविष्याच्या दृष्टीकोनातून एखादी योजना आखली असेल तर त्याचा नक्कीच फायदा होईल.गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. त्यामुळे आर्थिक कोंडी फुटेल. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील.
मिथुन : तीन ग्रहांची स्थिती या राशीचं नशिब चमकवणारं असेल. नशिबाची पूर्ण साथ या कालावधीत मिळेल. शेअर बाजार, लॉटरी अशा ठिकाणाहून पैसा मिळू शकतो. पण शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. आर्थिक जोखिम घेताना काळजी घ्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ चांगला जाईल. पत्नीकडून चांगली साथ मिळेल. कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल.
सिंह : तीन ग्रह तुम्हाला दिलासा देतील असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळेल. व्यवसायात प्रगती होताना दिसेल. नोकरीत बदल इच्छिणाऱ्या जातकांना अपेक्षित नोकरी मिळेल असं ग्रहमान आहे. पदोन्नतीसह पगारवाढ झाल्याने आर्थिक कोंडी फुटेल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील. एखादी गोड बातमी कानावर पडू शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)