AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 3rd May 2021 : या राशींवर भगवान शंकराची कृपा, कुणासाठी आजचा दिवस कसा?, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Horoscope 3rd May 2021 : सोमवारी शंकराची पूजा केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात, अशी आख्यायिका आहे. तसंच भगवान शंकराचीही कृपा दृष्टी आपल्यावर राहते, असा समज आहे. चला तर जाणून घेऊया आजचा आपला दिवस कसा असेल...

Horoscope 3rd May 2021 : या राशींवर भगवान शंकराची कृपा, कुणासाठी आजचा दिवस कसा?, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
कामाच्या बाबतीत या चार राशीचे लोक असतात खूप गंभीर
| Updated on: May 03, 2021 | 8:32 AM
Share

मुंबई : आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सोमवार…. सोमवार हा भगवान शिव शंकराचा दिवस… या दिवशी शंकराची पूजा केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात, अशी आख्यायिका आहे. तसंच भगवान शंकराचीही कृपा दृष्टी आपल्यावर राहते, असा समज आहे. चला तर जाणून घेऊया आजचा आपला दिवस कसा असेल…  कसं असेल राशीभविष्य.. (Horoscope 3rd May 2021 How Will your Day According to zodiac sign marathi Rashibhavishya)

मेष राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी ठीकठाक राहील. व्यवसायात कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. तब्येत चांगली राहिल. वैवाहिक जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृषभ राशी

कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवी जबाबदारी मिळू शकते. ऑफिसमध्ये दिवस उत्तम राहील. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. आहारावर लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. बुद्धीने आणि कौशल्याने केलेले काम यशस्वी होईल.

मिथून राशी

आजचा दिवस चढउतारांचा असू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. आपल्या आरोग्यासाठी सतर्क रहा. या दिवशी कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका.

कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन अपेक्षांचा असेल. पैशांच्या देवाण-घेवाणीत तुम्हाला फायदा होईल. थकलेले पैसे परत मिळू शकतात. तुमचा जीवनसाथी प्रत्येक निर्णयामध्ये तुम्हाला पाठिंबा देईल. पालकांचा आशीर्वाद घ्या.

सिंह राशी

आजच्या दिवसाचा फायद्याचा असू शकतो. जुन्या मित्रांच्या मदतीने तुम्हाला पैसे मिळवण्याचे नवीन स्रोत मिळतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांना आज फायदा होईल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तणाव असणार नाही. तब्येत ठीक राहील.

कन्या राशी

आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या बिघडलेल्या आरोग्यामुळे मन विचलित होऊ शकते. पैशाच्या बाबतीत परिस्थिती सामान्य असेल.

तूळ राशी

कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. तब्येत ठीक राहिल. ऑफिसचे काम लवकरच पूर्ण कराल. वाहन चालवताना खबरदारी घ्या. आवश्यकता नसल्यास आज घर सोडू नका.

वृश्चिक राशी

कामाच्या ठिकाणी असलेले काही लोक आपल्या सल्ल्याशी सहमत नाहीत, म्हणून त्यांच्याशी भांडू नका. विशेषतः पैशाच्या वादात अजिबात पडू नका. आज आपण वैवाहिक जीवनात आणि नात्यातही नवीन निर्णय घेऊ शकता. मनातील गोष्टी बऱ्याच जणांना सांगाल. वाहनापासून सावध रहा.

धनू राशी

कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसह काही नवीन काम करणे फायदेशीर ठरु शकते. जोडीदार आणि नातेवाईकांच्या सहाय्याने आपले विशेष काम पूर्ण केले जाऊ शकते. आज विद्यार्थ्यांना कमी कष्टाने अधिक फायदा होईल.

मकर राशी

कामामध्ये बदल जाणवेल. सहकारी आपल्या कामाचे कौतुक करतील. आपल्या जोडीदारासह आणि नातेवाईकांकडे जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. श्वासोच्छवासाच्या समस्या आज तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्या समस्यांना हलक्यात घेऊ नका.

कुंभ राशी

कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसह काही नवीन काम करणे फायदेशीर ठरु शकते. आपल्यावर थोडी नवीन जबाबदारी येऊ शकेल. आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

मीन राशी

कौटुंबिक आर्थिक स्थिती मजबूत होईल. वाहन चालवताना वेग थोडा नियंत्रित करा, अन्यथा यामुळे दुखापत होऊ शकते. आर्थिक प्रगतीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करण्यास तयार असाल तर तुम्हाला चांगले फायदे मिळतील.

(Horoscope 3rd May 2021 How Will your Day According to zodiac sign marathi Rashibhavishya)

हे ही वाचा :

पूजेमध्ये वापरण्यात येणार्‍या ‘या’ 4 गोष्टी कधीही शिळ्या होत नाहीत, जाणून घ्या यामागील कारण

Swapna Shastra : स्वप्नात या गोष्टी पाहणे असतं शुभ, स्वप्न शास्त्र काय म्हणते पाहुया

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.