
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 2 June 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल असून नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यापारात अचानक धनलाभ संभावतो. उधार व्यवहार टाळा. जोडीदाराच्या मदतीने कौटुंबिक मतभेद मिटतील. एकत्र भोजनाचा योग आहे. मुलांमध्ये उत्साह असेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. नकारात्मक विचार टाळल्यास मार्ग सुकर होईल.
वृषभ राशीच्या व्यक्तींना कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल. घरातील कामात मदत मिळेल. प्रवासाची योजना आखा. मित्र-मैत्रिणींच्या भेटीने मन प्रसन्न होईल. नोकरदारांची अनुकूल ठिकाणी बदली होईल. प्रवासाचा त्रास जाणवेल. आरोग्याच्या समस्या दूर होतील. परीक्षेची तारीख पुढे गेल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. अपेक्षित कामात यश मिळेल.
मिथुन राशीच्या व्यक्तींनी सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा. आजचा दिवस चांगला जाईल. कार्यालयीन कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. प्रवासात अनोळखी व्यक्तींच्या भेटीगाठीमुळे जीवनशैली बदलेल. वाहन खरेदीचा विचार तूर्तास पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी नवीन बदल होऊ शकतात. विद्यार्थी व महिलांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे.
कर्क राशीची लोक आजचा दिवस कौटुंबिक समस्या दूर करणारा असेल. जोडीदारासोबत सुखद क्षण अनुभवाल. अध्यात्मिक ओढ वाढेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. व्यावसायिकांना कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल, पण अपूर्ण कामे पूर्ण करा. गृहिणींवर कामाचा बोजा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. एखादा जुना आजार अचानक डोकं वर काढेल.
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सामान्य राहील. भावंडांसोबत संबंध सुधारतील. रस्त्यावर चालताना सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी दूर होतील. शालेय उपक्रमात सहभागी व्हाल. मनोबल उत्तम राहील. अविवाहितांसाठी विवाहाचे योग येतील. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने यश प्राप्ती होईल. धार्मिकस्थळी दान केल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. हल्लीच लग्न झालेल्यांना वैवाहिक जीवनात मधुरता आणि कुटुंबासोबत सुखद वेळ अनुभवायला मिळेल. खाद्यपदार्थ व घरगुती वस्तूंवर खर्च होईल. मुलांना खेळण्यासाठी बाहेर घेऊन जाल. रोजगाराची नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. राजकीय विषयावर तुमचे मत मांडल्यास त्याचा स्वीकार केला जाईल. व्यापाऱ्यांसाठी दिवस सामान्य राहील.
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंददायी आणि ऊर्जावान असेल. त्यामुळे तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. आत्मविश्वास बाळगावा. चुकीच्या लोकांपासून सावध रहा. काळजीपूर्वक निर्णय घ्या, घाई टाळा. मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवणे फायद्याचे ठरेल. जीवनसाथीमुळे घरात आनंदी वातावरण राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांना आज सन्मानात्मक वागणूक मिळेल. आर्थिक समस्या सोडवून कंपनीला दुप्पट लाभ मिळवून द्याल. वरिष्ठांकडून प्रशंसा आणि सन्मान मिळेल. तसेच वरिष्ठ पदावर नेमणूक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. व्यवसायात मुलांचे सहकार्य मिळेल. जुन्या मालमत्तेच्या व्यवहारातून अचानक धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना नव्या नोकरीची संधी मिळेल.
धनु राशीच्या व्यक्तींना प्रगतीची नवीन साधने मिळतील. चांगल्या लोकांच्या भेटीने दिवस सुधारेल. मन प्रसन्न होईल. व्यवसायात प्रगती होईल. वैवाहिक संबंधात नवचैतन्य निर्माण होईल. नवीन कल्पनांसह विशेष काम सुरु कराल. आत्मविश्वास वाढेल.
मकर राशीच्या व्यक्तींना प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासोबत रमणीय स्थळी जाण्याची योजना आखाल. सामाजिक आणि राजकीय कार्यात मन लागेल. आर्थिक बाजू सुधारेल. राजकारणातील व्यक्तींचा प्रभाव वाढेल. व्यवसायात दुप्पट लाभाचा योग संभवतो. मालमत्ता खरेदीसाठी आई-वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद घ्या.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहपूर्ण असेल. संध्याकाळपर्यंत घरात आनंदाचे वातावरण मिळेल. ऑफिसचे काम वेळेत पूर्ण होईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. अनावश्यक सल्ला देणे टाळा. व्यवसायात नवीन योजना सुरु करण्यापूर्वी इतरांचा सल्ला घ्या.
मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा असेल. संगीताकडे ओढा राहील. एखाद्या शोमध्ये गाण्याची अपेक्षित संधी मिळाल्याने खूप आनंदी असाल. घरात संततीरुपी लक्ष्मीचे आगमन होईल. लोकांची ये-जा आणि छोटी पार्टी संभवते. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा योग आखाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)