Zodiac NewYear2022 |सावधान ! 2022 मध्ये निर्माण होणार ‘त्रिग्रही योग’ , या 5 राशींच्या अडचणी वाढणार, तुमची रास यामध्ये आहे का?

| Updated on: Dec 21, 2021 | 12:22 PM

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्रिग्रही योग काही राशींसाठी शुभ मानला जात नाही. 5 राशींवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी

Zodiac NewYear2022 |सावधान ! 2022 मध्ये निर्माण होणार त्रिग्रही योग , या 5 राशींच्या अडचणी वाढणार, तुमची रास यामध्ये आहे का?
Zodiac
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मागील एक वर्ष सर्वांसाठीच खूप अवघड गेले आहे. नवीन वर्ष नवीन अशा घेऊन येणार आहे. पण येणारे 2022 वर्ष 5 राशींसाठी मात्र अवघड जाणार आहे. या वर्षात मकर राशीमध्ये शनी येणार असल्याने त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्रिग्रही योग काही राशींसाठी शुभ मानला जात नाही. 5 राशींवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

कर्क (Karka Rashi)

कर्क राशीच्या लोकांना या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमचे विरोधक तुमच्या विरोधात अनेक गोष्टी करतील. त्याचा तुमच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. याकाळात तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो.

कन्या (Kanya Rashi)

या काळात कन्या राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या कारणास्तव, अन्नाबद्दल खूप काळजी घ्या. विशेषतः बाहेरचे अन्न टाळावे. शिळे किंवा नसलेले अन्न खावूच नये.

तूळ (Tul Rashi)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या आरोग्याच्या बाबतीतही कठीण असू शकतो. या काळात मानसिक तणावात वाढ होईल. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. त्याच प्रमाणे घसा, छाती आणि पाठदुखीची समस्या असू शकते.

धनु (Dhanu Rashi)

जानेवारी महिना धनु राशीच्या लोकांसाठी काही अडचणी वाढवू शकतो. वैवाहिक जीवनात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत सतात होणाऱ्या वादामुळे तुमची मानसिक स्थितीही अस्थिर राहील. या काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या लोकांना काहीही साध्य करण्यासाठी अनेक पटींनी काम करावे लागेल. खर्च वाढतील, या काळात आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागू शकते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे

संबंधीत बातम्या :

Lord Shiva Puja | आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सोमवारी हे उपाय नक्की करुन पाहा

Astro Tips | “कुठं ठेवू अनं कुठं नको, अशी अवस्था होईल” एवढा पैसा येईल, त्यासाठी आठवड्याच्या सात दिवसात करायचे हे वेगवेगळे उपाय नक्की वाचा

Sankashti Chaturthi 2021 | कधी असणार वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी आणि पूजा मुहूर्त