यही रात अंतिम, यही रात भारी! एका रात्रीवर मरण… वैज्ञाानिकांनीही दिला संकेत, उद्या भविष्यवाणी खरी ठरणार?

उद्या, ५ जुलैसाठी जापानच्या प्रसिद्ध मंगा कलाकार र्यो तत्सुकी यांनी भविष्यवाणी केली आहे. आता ही भविष्यवाणी खरी ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यही रात अंतिम, यही रात भारी! एका रात्रीवर मरण... वैज्ञाानिकांनीही दिला संकेत, उद्या भविष्यवाणी खरी ठरणार?
baba Venga
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 04, 2025 | 4:23 PM

रामायण मालिकेत अंतिम युद्धापूर्वी रावण अस्वस्थ असतो. त्याच्या मनात उद्याच्या लढाईत काय होईल, याची चिंता असते. तेव्हा रवींद्र जैन यांच्या आवाजात पार्श्वसंगीत वाजते – “यही रात अंतिम, यही रात भारी…” आज जापानच्या लोकांचीही अशीच अवस्था आहे. होय, जापानबाबत एक भयावह भविष्यवाणी समोर आली आहे. जर ही भविष्यवाणी खरी ठरली, तर जापान जगाच्या नकाशावरून मिटू शकतो. जापानी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने देशाला हादरवून सोडले आहे. लोक भयभीत झाले असून त्यांना 5 जुलैला काय होईल, याची चिंता सतावत आहे.

जापानी बाबा वेंगाची भविष्यवाणी

जापानच्या प्रसिद्ध मंगा कलाकार र्यो तत्सुकी यांना जापानी बाबा वेंगा म्हणून ओळखले जाते. त्यांनी 5 जुलै 2025 बद्दल अशी भविष्यवाणी केली आहे, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. लोक वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. र्यो तत्सुकी यांच्या ‘द फ्यूचर आय सॉ’ या पुस्तकात 5 जुलै 2025 रोजी एक विनाशकारी नैसर्गिक आपत्ती येण्याचा दावा करण्यात आला आहे. या पुस्तकात म्हटलं आहे की, 5 जुलै 2025 रोजी एक प्रचंड भूकंप आणि त्यामुळे निर्माण होणारी त्सुनामी जापानला उद्ध्वस्त करेल. ही सुनामी 2011 च्या त्सुनामीपेक्षा तिप्पट तीव्र असेल.

वाचा: बाबा वेंगाचे नवे भाकीत! ‘या’ चार राशींचे नशीब पलटणार, होणार गडगंज श्रीमंत

5 जुलै 2025: कयामताची रात्र?

या भविष्यवाणीमुळे सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे. यामुळे #July5Disaster हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. लोक इतके घाबरले आहेत कारण जापानची जमीन सध्या सातत्याने हादरत आहे. गेल्या काही दिवसांत जापानच्या दक्षिण क्युशू बेटसमूहाजवळ 900 हून अधिक भूकंप नोंदवले गेले आहेत. यातील बहुतांश भूकंप किरकोळ होते, तरीही या घटनांनी भविष्यवाणीच्या भीतीला आणखी वाढवलं आहे. असं वाटतंय की, 5 जुलैपूर्वीची कयामताची रात्र आजच आहे.

आपत्ती टाळण्यासाठी नवीन योजना

जापान सरकारने 2014 मध्ये भूकंप-तियारी योजना सादर केली होती, ज्याचा उद्देश मृत्यूदर 80 टक्क्यांनी कमी करणे होता. मात्र, नवीन अहवालांनुसार ही योजना फक्त 20 टक्के प्रभावी ठरू शकते. या योजनेअंतर्गत तटबंदी आणि निर्वासन इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. उच्चीवर असलेल्या ठिकाणांचे अलर्ट सिस्टम अपडेट करण्यात आले आहे.