Name Astrology : या 4 नावाच्या मुली असतात वडिलांसाठी लकी… सासरच्यांसाठी…?

ज्योतिषशास्त्रानुसार, 'स', 'प', 'ब' आणि 'ऐ' या अक्षरांनी सुरू होणारी नावे असलेल्या मुली अतिशय भाग्यवान मानल्या जातात. या मुली कुटुंबासाठी आर्थिक समृद्धी आणि सुख-शांती आणतात. करिअरमध्ये यशस्वी होतात आणि विवाहानंतर त्यांचे भाग्य अधिक चमकते.

Name Astrology : या 4 नावाच्या मुली असतात वडिलांसाठी लकी... सासरच्यांसाठी...?
Astrology
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 13, 2025 | 6:28 PM

ज्योतिषशास्त्रानुसार काही नावे आणि त्यांच्या अक्षरांना विशेष महत्त्व दिलं जातं. नावात काय आहे म्हटलं जातं. पण ज्योतिष शास्त्रात नावातच बरंच काही असल्याचं सांगितलं जातं. काही नावांची लोकं तर अत्यंत भाग्यवान असतात. आम्ही अशा चार नावांच्या मुलींबाबत सांगत आहोत की, ज्या खरोखरच तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतात. तुमच्या प्रेमात आणि नोकरीत अडथळा असेल, घरात वाद असतील तर या मुलींशी लग्न करणं तुमच्यासाठी शुभ ठरू शकतं. या मुली आईवडिलांसाठी आणि कुटुंबासाठी भाग्यवंत असतात. ज्योतिषशास्त्रातही तसं नमूद करण्यात आलं आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, स, प, ब आणि ऐ अक्षरांनी ज्या मुलींचं नाव सुरू होतं, त्या मुली अत्यंत भाग्यवंत असतात. या मुली आईवडिलांसाठी तर लकी असतातच पण ज्याच्याशी यांचं लग्न होतं, त्यांच्यासाठीही या मुली लकी ठरतात. या मुली इमानदार असतात, चारित्र्यसंपन्न असतात, समजदार असतात, हुशार असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मेहनती असतात. आपला संसार नीट पार पाडतात.

‘स’ अक्षर

स अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली अत्यंत आकर्षक आणि सुंदर असतात. त्या आपल्या करिअरमध्ये खूप पुढे जातात. त्या ज्या ठिकाणी असतात तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यांचं वागणं आणि बोलणं दुसऱ्यांवर छाप पाडतं.

‘प’ अक्षर

या अक्षरांच्या मुली ध्येयवादी असतात. यांचं ध्येयासाठीचं वेड आणि आत्मविश्वास त्यांना यशाच्या शिखरावर नेतात. त्या कुटुंबासाठी सौभाग्यशाली असतात. या मुलींना सासरी सन्मान आणि प्रेम मिळतं.

‘ब’ अक्षर

या नावाच्या मुलींकडे जन्मजात नेतृत्व क्षमता असते. कठिण प्रसंगात त्या अत्यंत खंबीरपणे उभ्या असतात. आपल्या विवेकाने प्रत्येक समस्येंवर त्या मात करतात. लक्ष्याला गाठल्याशिवाय त्या राहत नाहीत. नवरा आणि कुटुंबासाठी या मुली अत्यंत शुभ असतात.

‘ऐ’ अक्षर

‘ऐ’ या अद्याक्षराने ज्या मुलींचं नाव सुरू होतं, त्या अत्यंत नशिबवान असतात. या मुली जिथेही जातात तिथे धन, समृद्धी आणि सुख शांती आपोआप चालत येतात. या मुली कुटुंबात सौख्य घेऊन येतात. आपल्या वागण्याने सर्वांचं मन जिंकतात. या महिला आपल्या कुटुंबासाठी अत्यंत लकी असतात.

विवाहानंतर भाग्य चकाकते

या महिलांचं भाग्य विवाहानंतर अधिक प्रबळ होतं. या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायित्व किंवा यश आणत नाहीत तर सासरी आदर आणि सन्मान प्राप्त करतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)