AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला करा राशीनुसार दान, मिळेल अधिक पुण्य

यावेळी मकर संक्रांतीच्या दोन तारखांबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. तथापि, जेव्हा सूर्य देव आपली राशी बदलतो आणि मकर राशीत पोहोचतो तेव्हा संक्रांतीची सुरुवात होते.

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला करा राशीनुसार दान, मिळेल अधिक पुण्य
मकर संक्रातImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 14, 2023 | 8:14 PM
Share

मुंबई, मकर संक्रांती (Makar Sankranti 2023) हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. हा सण संपूर्ण भारतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. हा सण इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण कधी कधी हा सण 15 जानेवारीलाही येतो. सूर्य धनु राशीतून कधी मकर राशीत प्रवेश करतो यावर ते अवलंबून असते. या दिवशी सूर्याचे उत्तरायण संचलन सुरू होते आणि म्हणूनच याला उत्तरायणी असेही म्हणतात.

यावेळी मकर संक्रांतीच्या दोन तारखांबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. तथापि, जेव्हा सूर्य देव आपली राशी बदलतो आणि मकर राशीत पोहोचतो तेव्हा संक्रांतीची सुरुवात होते. जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत येते. या वर्षी 14 जानेवारी रोजी रात्री 08.57 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल.

अशा स्थितीत मकर संक्रांतीचा मुहूर्त 15 जानेवारीला येत आहे. मात्र सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा काळ असल्याने संक्रांतीच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्योतिषाचार्य पं. मनोज कुमार द्विवेदी यांच्या मते, शनिवार, 14 जानेवारी रोजी सूर्याचा मकर संक्रांतीचा मुहूर्त 08:57 वाजता येत असला तरी, रात्रीच्या वेळी स्नान आणि दान नाही. यासाठी उदय तिथीची मान्यता आहे म्हणजेच सूर्योदय झाल्यावर मकर संक्रांतीचे स्नान आणि दान असेल. म्हणूनच या वर्षी मकर संक्रांती रविवार, 15 जानेवारी 2023 रोजी साजरी केली जाणार आहे.

राशीनुसार या गोष्टी दान करा

  1. मेष – पिवळी फुले, हळद, तीळ पाण्यात मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तीळ-गुळाचे दान करावे.
  2. वृषभ – पाण्यात पांढरे चंदन, दूध, पांढरी फुले, तीळ टाकून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे. खिचडी दान करा.
  3. मिथुन – पाण्यात तीळ टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. मूग डाळ खिचडी दान करा.
  4. कर्क- दूध, तांदूळ, तीळ पाण्यात मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळेल. गूळ, तीळ दान करा.
  5. सिंह- कुंकुम आणि रक्तपुष्प, तीळ पाण्यात टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करा.गुळ, तीळ दान करा.
  6. कन्या- पाण्यात तीळ, दुर्वा, फुले टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. मूग डाळीची खिचडी बनवून दान करा. गाईला चारा द्या.
  7. तूळ- पांढरे चंदन, दूध, तांदूळ दान करा. पांढरे चंदन मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
  8. वृश्चिक- कुमकुम, रक्तपुष्प आणि तीळ पाण्यात मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे. गुळाचे दान करावे.
  9. धनु – हळद, केशर, पिवळी फुले पाण्यात मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. गुळाचे दान करावे.
  10. मकर- पाण्यात निळी फुले, तीळ मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे. काळ्या तीळाची खिचडी, उडीद डाळ दान करा.
  11. कुंभ – पाण्यात निळी फुले, तीळ मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे. उडीद, तीळ दान करा.
  12. मीन- हळद, केशर, पिवळ्या फुलांमध्ये तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. तीळ, गूळ दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले