Rama Ekadashi : रमा एकादशीला एकादशीला राशीनुसार करा श्रीहरीची पुजा, होतील सर्व मनोकामना पूर्ण

रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्व एकादशींमध्ये रमा एकादशीचे महत्त्व अनेक पटींनी मोठे मानले जाते. रमा एकादशी इतर दिवसांपेक्षा हजारो पटीने अधिक फलदायी मानली जाते.

Rama Ekadashi : रमा एकादशीला एकादशीला राशीनुसार करा श्रीहरीची पुजा, होतील सर्व मनोकामना पूर्ण
एकादशी
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 07, 2023 | 2:28 PM

मुंबई : सनातन पंचांगानुसार रमा एकादशी (Rama Ekadashi 2023) 09 नोव्हेंबर रोजी आहे. हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. याशिवाय त्याच्यासाठी एकादशीचे व्रतही पाळले जाते. जगाचे निर्माते भगवान विष्णू आपल्या भक्तांचे रक्षण करतात. तसेच त्यांचे सर्व दु:ख दूर करतात. त्यामुळे भक्त भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करतात. तुम्हालाही भगवान विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर रमा एकादशीला तुमच्या राशीनुसार भगवान विष्णूची पूजा करा. जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया प्रत्त्येक राशी नुसार कशी पुजा करावी.

राशीनुसार पूजा करा

  • मेष राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या तिथीला भगवान विष्णूची यथासांग पूजा करावी. यावेळी भगवान विष्णूला लोणी आणि साखरेचा प्रसाद म्हणून अर्पण करा.
  • वृषभ राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तांदळाची खीर अर्पण करावी. हा उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
  • मिथुन राशीच्या लोकांनी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रमा एकादशीला लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. तसेच भगवान विष्णूला दुर्वा अर्पण करा.
  • कर्क राशीच्या लोकांनी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रमा एकादशी तिथीला भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा करावी. तसेच प्रसाद म्हणून दूध, दही आणि खीर अर्पण करा.
  • सिंह राशीच्या लोकांनी श्री नारायण हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना गूळ आणि लाडू अर्पण करावेत.श्री हरी विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी स्नान, ध्यान आणि केशरमिश्रित दुधाचा अभिषेक करावा.
  • तूळ राशीच्या लोकांनी रमा एकादशी तिथीला विधीनुसार भगवान श्री हरी विष्णूची पूजा करावी. तसेच देवाला प्रसाद म्हणून खीर अर्पण करावी.
  • वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी रमा एकादशीच्या दिवशी दुधात मध मिसळून अभिषेक करावा. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी धनु राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी केशर मिसळलेल्या दुधाचा अभिषेक करावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
  • भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हरभरा डाळ आणि गुळाचा प्रसाद अर्पण करावा.
  • भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करावी. तसेच प्रसादात फळे अर्पण करा.
  • मीन राशीच्या लोकांनी रमा एकादशी तिथीला पूजेदरम्यान भगवान विष्णूला पिवळी फुले आणि फळे अर्पण करावीत. तसेच विष्णु चालिसाचे पठण करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)