
ग्रहांची स्थिती एका ठरावीक कालावधीनंतर बदलत असते. त्यामुळे ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. गुरु ग्रह ऑक्टोबर महिन्यात उच्च राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनि देवांसोबत नवपंचम योग तयार होणार आहे. यामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. सध्या शनि देव हे मीन राशीत विराजमान आहेत. त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या स्थानावर असणार आहेत. या स्थितीमुळे 120 डिग्रीचा कोन तयार होतो. या योग काळात शिक्षण, ज्ञान, न्याय आणि आध्यात्मिक विकास होतो. हा योग शुभ मानला जातो आणि दोन्ही ग्रहांमुळे सकारात्मक प्रभाव पडतो. सध्या सूर्य आणि शनिच्या वक्री स्थितीमुळे नवपंचम योग तयार झाला आहे. असं असताना कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल ते जाणून घ्या.
कर्क : या राशीत गुरु येणार असल्याने नवपंचम योग तयारी होईल. त्यामुळे गुरु लग्न स्थानात असल्याने आत्मविश्वास आणि लोकप्रियता वाढेल. आपल्या हातातील किचकट कामं पूर्ण होतील. तसेच व्यवसायात प्रगतीचे योग चालून येतील. एकंदरीत तुमच्या कामाच्या शैलीत सकारात्मक बदल दिसून येईल. लग्नासाठी स्थळ शोधणाऱ्यांना या काळात योग्य वर-वधू मिळू शकते.
मेष : या राशीच्या चतुर्थ स्थानात नवपंचम योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना भौतिक सुखांची प्राप्ती होईल. या काळात वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. विदेशात व्यापार असलेल्या जातकांना लाभ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगला पगार मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं देखील या काळात पूर्ण होऊ शकतात.
मीन : शनिदेव याच राशीत विराजमान आहेत. त्यामुळे या राशीच्या पंचम स्थानात हा योग तयार होणार आहे. प्रेम प्रकरणात यश मिळू शकतं. तसेच ठरावीक कालावधीनंतर धनलाभ होण्याचा योग आहे. मुलांची प्रगती या काळात होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं एक एक करून मार्गी लागतील. शेअर बाजारात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)