
आता थोड्याच दिवसांमध्ये गुरु आपली चाल बदलणार आहेत, जसं शनी देवांना कर्मफळ दाता म्हणून ओळखलं जातं, तसंच गुरुला त्याच्या स्वभावानुसार गुरु म्हणूनच ओळखलं जातं. सध्या शनी देव हे मीन राशीमध्ये आहेत, तर गुरु हे मिथुन राशीमध्ये आहेत. दिवाळीनंतर लगेचच हे दोन्ही ग्रह आपली चाल बदलणार आहेत. दिवाळीनंतर शनी मार्गी तर गुरुची वक्री चाल असणार आहे. पंचागानुसार येत्या नोव्हेंबर महिन्यात हा बदल होणार आहे. या बदलाचा तीन राशींवर जबरदस्त प्रभाव पडणार असून, या राशींचं भाग्य चमकणार आहेत? कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
मिथुन रास – नोव्हेंबर महिन्यात शनि मार्गी तर गुरु हे वक्री असणार आहेत. याचा खूपच शुभ प्रभाव हा मिथुन राशीवर पडणार आहे. जे व्यापार करतात त्यांना या महिन्यात फायदाच फायदा होणार आहे, एखाद्या मोठ्या डीलचा या काळात योग असून, त्यातून मोठ्या प्रमाणात या राशींच्या लोकांना नफा होण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांना देखील चांगल यश मिळण्याची शक्यता आहे. तसे ग्रह योग निर्माण होताना दिसत आहेत. नोकरदार वर्गाला देखील मोठा फयदा होण्याची शक्यता आहे. ऑफिसममध्ये मान सन्मान वाढणार आहे.
तुळ रास – तुळ राशीच्या लोकांना देखील येत्या नोव्हेंबर महिन्यात मोठा जॅकपॉट हाती लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तुमच्या कार्यक्षेत्रात ज्या अडचणी येत होत्या त्या आता दूर होणार आहेत. तुम्हाला अशा काही नव्या संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल. नोकरदार वर्गाला या काळात ऑफीसमध्ये एखादी नवी जबाबदारी मिळू शकते, तसेच प्रमोशनचा देखील योग आहे. या काळात काही नव्या लोकांची ओळख होऊ शकते.
मकर रास- मकर राशीच्या लोकांसाठी सुद्ध हा ग्रह योग खूपच फायद्याचा ठरणार आहे, कार्यक्षेत्रात नव्या संधी प्राप्त होणार आहेत, एवढंच नाही तर आर्थिक उत्पन्नामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)