Budh Grah: शनिदेवानंतर बुध ग्रहही जाणार अस्ताला, राशीचक्र आणि मानवी जीवनावर होणार असा परिणाम

| Updated on: Feb 04, 2023 | 7:19 PM

शनि आणि बुध ग्रह दोन्ही एकाच वेळी अस्त असणार आहेत. त्यामुळे 25 फेब्रुवारी ते 6 मार्च हा कालावधी काही राशींसाठी अडचणींचा ठरणार आहे. त्यामुळे या काळात काळजी घेणं आवश्यक आहे.

Budh Grah: शनिदेवानंतर बुध ग्रहही जाणार अस्ताला, राशीचक्र आणि मानवी जीवनावर होणार असा परिणाम
शनि आणि बुध ग्रह दोन्ही एकाच वेळी अस्त असणार आहेत. त्यामुळे 25 फेब्रुवारी ते 6 मार्च हा कालावधी काही राशींसाठी अडचणींचा ठरणार आहे. त्यामुळे या काळात काळजी घेणं आवश्यक आहे.
Follow us on

मुंबई: सूर्यमालिकेतील ग्रह परिवलनासोबत परिग्रहण करत असतात. या खगोलीय घडामोडींचं ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व असतं. कारण ग्रहांची स्थिती, युती, अस्त होणं आणि वक्री स्थितीत जाणं यामुळे बराच परिणाम होत असतो. ग्रह मालिकेत बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असून सर्वाधिक वेळा अस्ताला जातो. कारण बुध हा ग्रह सूर्याच्या एक स्थान मागे किंवा पुढेच फिरत असतो. 7 फेब्रुवारीला बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागणार आहे. असं असताना दुसरीकडे, ग्रहमंडळात न्यायदेवतेची भूमिका बजावत असलेला शनि ग्रह अस्ताला गेला आहे. त्यामुळे राशीमंडळात बरीच उलथापालथ सुरु आहे. दुसरीकडे ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा कारक असलेला ग्रह 25 फेब्रुवारीला अस्ताला जाणार आहे. त्यामुळे एकाच वेळी शनि आणि बुध ग्रह अस्ताला गेल्याने ज्योतिष्यांचं लक्ष लागून आहे. कोणताही ग्रह सूर्याच्या अगदी जवळ गेला की, त्याचं तेज कमी होतो. तसेच ग्रह बळहीन होतो. त्यामुळे मानवी जीवनावर त्याचे विपरीत परिणा दिसून येतात.

नेमकी काय स्थिती आहे

30 जानेवारी 2023 पासून शनिदेव स्वराशी असलेल्या कुंभ राशीत अस्ताला गेले आहेत. या स्थितीते 6 मार्चपर्यंत असणार आहेत. दुसरीकडे 25 फेब्रुवारी बुध ग्रह अस्ताला जाणार आहे. या स्थितीत 27 मार्चपर्यंत असणार आहे. जवळपास 31 दिवस बुध ग्रह अस्ताला जाणार आहे. बुध ग्रह अस्त स्थितीत असताना कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच 6 मार्चपर्यंत कुंभ राशीत शनि आणि बुध ग्रह अस्त स्थितीत असेल. त्यामुळे काही जातकांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे 25 फेब्रुवारी ते 6 मार्च असा जवळपास 10 दिवस शनि साडेसाती आणि अडीचकी सुरु असणाऱ्या जातकांना त्रास सहन करावा लागेल. सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी या काळात जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

शनि-बुध ग्रह अस्ताला गेल्याने काय होतं?

शनिदेव अस्ताला गेल्याने मणका, गुडघ्याचं दुखणं सुरु होतं. तसेच मानसिक त्रास होण्यासही सुरुवात होते. तर बुध ग्रह अस्त असेल तेव्हा आत्मविश्वास, शारिरीक दुखणं, श्वास, त्वचा रोग आणि गळ्याचे आजार होता. या काळात तरुणांचं बुद्धी काम करत नाही. तसेच कोणत्याही कामात मन लागत नाही. अनेकदा तरूण नशेच्या आहारी जातात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)